Market Committee Election : जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान

market committee election
market committee electionesakal
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर मंगळवारी (ता.२१) सहकार प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार बाजार समित्यांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतदानानंतर पुढील तीन दिवसात मतमोजणी होईल.

२७ मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. ३ एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. (Market Committee Election Voting for market committees in district on April 28 nashik news)

संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष लागलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या मध्ये नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, लासलगाव, घोटी, येवला, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव अशा चौदा बाजार समित्यांचा समावेश आहे.

या साठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात येऊन तब्बल २० महिन्यांचा कालावधी उलटला होता. राज्यात सत्तांतर झाले त्यानंतर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना उमेदवारी, तसेच मतदानाचा अधिकार देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने घेतली होती.

बाजार समिती अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करणारे विधेयक सरकारने मांडले होते. ते विधेयक अधिवेशनात मंजूर झाले. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम स्थगित झाला होता. दरम्यानच्या काळात समित्यांची सूत्रे संचालक मंडळाकडून प्रशासकांकडे गेली होती.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणुकांवरील स्थगिती उठवत ३० एप्रिलअखेर राज्यातील सर्वच समित्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. या आदेशानुसार, सहकार प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित केला. यात १० फेब्रुवारीपासून मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरू झाला होता.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

market committee election
World Water Day | हर घर जल गाव व हागणदारीमुक्त-अधिक गावांची घोषणा करावी : ZP CEO आशिमा मित्तल

यात २७ फेब्रुवारीला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. यावर ८ मार्च पर्यंत हरकती नोंदविण्यात आल्या. प्राप्त झालेल्या हरकतींवर १७ मार्चपर्यंत सुनावणी प्रक्रीया पार पडली. सर्व हरकतींवर सुनावणी होऊन २० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सहकार प्राधिकरणाने निवडणुका घोषित केल्या आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

१) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे : २७ मार्च २०२३

२) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी : २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३

३) नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची तारीख : ५ एप्रिल २०२३

४) छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीची तारीख : ६ एप्रिल २०२३

५) उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी : ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२३

६) निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा

व निशाणी वाटप करण्याची तारीख २१ एप्रिल २०२३

७) मतदान २८ एप्रिल २०२३

८) मतमोजणी मतदान दिनांकापासून तीन दिवसांच्या आत.

market committee election
Nashik News | मुंबई IITतर्फे 300 कर्मचाऱ्यांना स्तनपान, कुपोषण प्रशिक्षण : ZP CEO आशिमा मित्तल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()