Market Committee Elections : बाजार समिती निवडणुकांना ब्रेक लागणार?;

market committee election
market committee electionesakal
Updated on

नाशिक : अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. बाजार समित्यांसाठी मतदारयादीही अंतिम करण्यात आली आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांनी बाजार समित्यांच्या निवडणुकीत खोडा घातला आहे. नव्या ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समित्यांसाठी मतदान करता येणार नसल्याने यासंदर्भात कोल्हापूर, औरंगाबाद येथील काहींनी आणि शासनानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी (ता. १२) सुनावणी होणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Market Committee Elections Market Committee Elections will have break Nashik News)

ऑक्टोबरमध्ये सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील २८६ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील काही बाजार समितीचे संचालक आणि राज्य सरकारने न्यायालयात धाव घेत बाजार समितीच्या निवडणुकीला स्थगिती मिळावी, अशी मागणी केली आहे. काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण देत सहकारातील सर्व निवडणुका २० डिसेंबर २०२२ स्थगित करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर आता बाजार समित्यांच्याही निवडणुकीला स्थगिती येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यात सध्या ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर नव्याने ग्रामपंचायत सदस्य निवडून येतील. सध्याच्या बाजार समित्यांच्या मतदारयादीत जुन्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ग्रामपंचायत सदस्य बदलणार आहेत. त्यांना बाजार समितीमध्ये मतदानाचा हक्क मिळावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

market committee election
Nashik Weather Update : पारा वाढला अन्‌ थंडी घटली; तापमान 12.6 अंश सेल्‍सीअसवर

नावे नसल्याने कोर्टात जाणार?

नाशिक बाजार समितीची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या प्रारूप मतदारयादीत पेठ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायत सदस्यांची, तसेच त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यातील अनुक्रमे ५७ व १८ ग्रामपंचायत सदस्यांची नावे समाविष्ट न करण्यात आल्याने विनायक माळेकर, बहिरू मुळाणे, युवराज कोठुळे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे हरकत नोंदविली होती. मात्र, ती फेटाळून लावली आहे. या विरोधात त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

मतदारयादीत पडणार मोठा फरक

बाजार समित्यांसाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विकास सेवा सोसायट्या, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी व हमाल हे मतदान करत असतात. यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांची संख्या मोठी आहे. मतदानाच्या अंतिम यादीनुसार सुमारे ३० हजार ४९८ हजार मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहे. जिल्ह्यात १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. यातून सुमारे दोन हजार ५०० ते तीन हजार नवीन मतदार तयार होणार आहे. त्यामुळे स्थगिती मिळाल्यास जुने ग्रामपंचायत सदस्य जाऊन नवीन सदस्य त्यांची जागा घेतली. निवडणुकांनंतर बाजार समिती मतदारयादीत मोठा फरक पडणार आहे.

market committee election
Nashik Crime News : चेन स्नॅचिंगसह घरफोडीत 6 लाखांचा ऐवज लांबविला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.