Nandgaon Market Committee : बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी आमदार सुहास कांदे पुरस्कृत शिवसेना-भाजपा विरुद्ध माजी आमदार ॲड.अनिल आहेर पंकज भुजबळ यांच्या महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांत अठरा जागेसाठी सरळ लढत होत आहे.
बुधवारी (ता.२०) बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात माघारीसाठी दोघाही गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांची अर्ज माघारीसाठी मोठी गर्दी दिसून आली. या निवडणुकीसाठी ११७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यात त्यात ७७ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात चाळीस उमेदवार रिंगणात राहिले आहे. (Market Committee kande to Nandgaon direct fight in Mahavikas Aghadi Withdrawal of 77 candidates nashik news)
आज झालेल्या माघारी नंतर सोसायटी गटातून ४७ जणांनी माघार घेतल्याने २३ रिंगणात तर ग्रामपंचायत गटात २३ उमेदवारांनी माघार घेतल्याने १० उमेदवार रिंगणात आहे. व्यापारी गटात ३ माघार तर ५ रिंगणात आहे. हमाल मापारी गटात चौघांनी माघार घेतल्याने या ठिकाणी सरळ लढत बघावयास मिळणार आहे.
ग्रामपंचायत गटात अनिल वाघ, अर्जुन पाटील, दीपक मोरे, अनिल सोनवणे, सोसायटी गटात मंगला काकळीज अलका कवडे, महिला तर विजाभज मधून पोपट सानप, इतर मागास प्रवर्गमधून विलास आहेर तर सोसायटी सर्वसाधारण एकनाथ सदगीर,
कैलास पाटील, समाधान पाटील, साहेबराव पगार, जीवन गरुड, सतीश बोरसे, व्यापारी गटातून यज्ञेश कलंत्री, अमोल नावंदर, तर हमाल मापारी गटात भास्कर कासार यांच्या नावाची घोषणा झालेली नव्हती. मात्र या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत माजी सभापती विलास आहेर यांनी दिले.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलमध्ये सोसायटी सर्वसाधारण गटात दिलीप नंद, शिवाजी वाघ, धोंडीराम काळे, दर्शन आहेर, हरेश्वर सुर्वे, विजय इप्पर, समाधान बोगीर, अमित नहार, महिला गटातून चंद्रभागा वाबळे बेबीताई पगार, इतर मागास वर्ग गटातून मविप्र संचालक अमित बोरसे, विमुक्त जाती भटक्या जमाती जागेतून ॲड. सुरेश आव्हाड,
ग्रामपंचायत सर्वसाधारण दीपक खैरनार, उदय पवार, ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती गटात अशोक जाधव, आर्थिक दुर्बल गटातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, व्यापारी गटातून मुकुंद खैरनार यांची उमेदवारी महाआघाडीने घोषित केली. मात्र दुसऱ्या जागेवरच्या तसेच हमाल मापारी गटात उमेदवार जाहीर केलेला नाही. तर
भाऊसाहेब सोनवणे यांनी सोसायटी गटातील सर्वसाधारण जागेवर आणि ग्रामपंचायत गटाच्या अनुसूचित जाती जमाती गटातून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. अन्य उमेदवारांमध्ये ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण गटात संतोष राठोड, व्यापारी गटात गोकुळ कोठारी, संजय सानप, हमाल मापारी गटात नीलेश इप्पर, हेही या निवडणूक रिंगणातील अन्य उमेदवार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.