Nashik News : बाजार समिती सचिव अरुण काळे बडतर्फ; कर्तव्यात कसूर भोवला

Market Committee nashik
Market Committee nashikesakal
Updated on

Nashik News : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांच्यावर राज्याचे सहसचिव डॉ. सुप्रिय धपाटे यांच्या आदेशान्वये निलंबित करीत जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार बाजार समितीने एक महिन्याच्या आत त्यांची खातेनिहाय चौकशीत दोषी निष्पन्न झाले आहेत.

हाच कर्तव्यात कसूर काळे यांना चांगलाच भोवला असून, त्यांचेवर बडतर्फ करण्याचे आदेश सभापती देवीदास पिंगळे यांनी दिले आहेत. (Market Committee Secretary Arun Kale dismissed from duty nashik news)

नाशिक जिल्ह्यातील दोनशे शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी प्रकरणात झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत येथील बाजार समितीचे तत्कालीन सचिव अरुण काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून आपल्या मार्फत खुलासा सादर करण्याबाबत सूचित केले होते.

तसेच माजी संचालक शंकरराव धनवटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर तत्कालीन पणनमंत्री यांनी काळे यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाईबाबत निर्देश दिले होते. तसेच, काळे यांनी सादर केलेला खुलासा शासन स्तरावरून अमान्य करण्यात आलेला होता. शासन आदेशानुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सभापती देवीदास पिंगळे यांनी निलंबनाचे व खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते.

जिल्हा उपनिबंधक यांनी केलेल्या आदेशानुसार खातेनिहाय चौकशी एक महिन्याच्या आत पूर्ण होऊ नये, यासाठी काळे हे राहते घर व मोबाईल बंद करून बाहेर गेल्यामुळे बाजार समिती प्रशासनाला आरोपपत्रांची अंमलबजावणी करता येऊ शकली नव्हती.

Market Committee nashik
Nashik News : माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने १२ पानी आरोपपत्र काळे यांच्या घराबाहेरील गेटवर चिकटवून दिले होते.

चौकशी ही ९ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबरला नाशिक रोड येथील पी. व्ही. लोखंडे यांच्या कार्यालयात मनोज नागापूरकर यांचेद्वारा सुरू झाली होती. यात १३ जणांची साक्ष नोंदविण्यात आली, तसेच काळे यांना देखील सदर साक्षीदारांची उलट तपासणी घेण्याची संधी देण्यात आली.

१७ ऑक्टोबरला खातेनिहाय चौकशी संपली व १८ ऑक्टोबरला याबाबतचा अहवाल बाजार समितीकडे सादर करण्यात आला. त्यानुसार बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे यांच्या सहीनिशी गुरुवार (ता. २६)पासून कार्यालयीन वेळेनंतर बडतर्फ करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले.

Market Committee nashik
IT Raid Nashik : नाशिक-सिन्नर रस्त्यावरील टोलनाक्यावर आयकर विभागाची धाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.