नवरात्रोत्सावाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत नवचैतन्य; खरेदीसाठी महिलांची गर्दी

Navratri Shopping
Navratri Shoppingesakal
Updated on

नाशिक : मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेली पावसाची संततधार, सर्वच वस्तुंचे वाढलेले भाव. त्यातच आलेल्या पितृपक्षामुळे बाजारपेठेत काहीशी मरगळ आली होती. मात्र, घटस्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर महिलांसह अन्य समाजघटकांनी रविवारी (ता. २५) खरेदीत उत्साह दाखविल्याने बाजारपेठ नवचैतन्य बहरल्याची अनुभूती मिळाली.

गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षामुळे बाजारपेठेले काहीशी मरगळ आली होती. त्यातच सिलिंडर भाजीपाला व अन्य वस्तुंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महिलांचे आर्थिक बजेटही कोलमडले होते. मात्र, नवत्रोत्सवामुळे रविवारी बाजारपेठेत पूजा साहित्यासह इतर वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती.

यामुळे बाजारपेठ नवचैतन्याने बहरल्याचे दिसून आले. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येाला शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड, रविवार कारंजा, शालिमार, भद्रकाली, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा आदी परिसरात महिलांची खरेदीसाठी लगबग दिसून आली. (market crowded by women for shopping in Navratri 2022 Nashik Latest Marathi News)

Navratri Shopping
Navratrotsav 2022 | पहिली माळ : ग्रामदैवत श्री भद्रकालीदेवी मंदिर

कोरोनामुळे संपूर्ण शहर बंद असताना, नवरात्रोत्सवावरही बंधने आली होती. यंदा कोरोनाचे मळभ दूर झाल्याने नवरात्रोत्सव करता येणार असल्याने नाशिककरांमध्ये विशेषत: महिलांमध्ये मोठा उत्साह होता. रविवारी बाजारात घट, पूजा साहित्य, फुले आदींची खरेदी करण्यात आली. शहरासह ग्रामीण भागातील अनेक महिलांनी मातीसह चाफ्याची आणि नागलीची पाने विक्रीसाठी आणली होती. बाजारात दहा रुपयांप्रमाणे मातीचा वाटा विक्रीस होता.

नागलीची पाने १५ रुपये डझन आणि २० रुपयांना पाच याप्रमाणे चाफ्याच्या पानांची विक्री झाली. मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने फुलशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यातच पितृपक्षामुळे फुल बाजारात तेजी आल्याने आधी १५ रुपयांना मिळणारी देवीच्या वेणीची ३० रुपयांना विक्री सुरू होती. एरवी दहा रुपयांत मिळाणाऱ्या फुलांच्या वाट्यासाठी २० रुपये मोजावे लागले. अनेक व्यावसायिकांनी पूजेसाठी लागणारे पाच प्रकारची फळे ३० ते ४० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध केली होती.

Navratri Shopping
BJPची ताकद असताना शिंदे गटाचा वरचष्मा; पालकमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()