Eid-e-Milad: ईद-ए-मिलाद निमित्ताने बाजारपेठ सजली! सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी मुस्लिम बांधवांकडून गर्दी

Muslim brothers shopping for various decorative items on the occasion of Eid-e-Milad.
Muslim brothers shopping for various decorative items on the occasion of Eid-e-Milad.esakal
Updated on

Eid-e-Milad : ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील बाजारपेठ सजावटीच्या विविध वस्तूंनी सजली आहे. यात धार्मिक झेंड्यांसह विविध वस्तू खरेदीसाठी मुस्लिम बांधवांकडून गर्दी केली जात आहे. (Market decorated on occasion of Eid e Milad Crowded by Muslim to buy decorative items nashik)

हजरत मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. गुरुवार (ता.२८) रोजी ईद साजरी करण्यात येणार आहे. शुक्रवार (ता.२९) रोजी जुने नाशिक परिसरातून जुलूस काढण्यात येणार आहे.

त्यानिमित्ताने तयारीस वेग आला आहे. घरोघरी रंगरंगोटी, सजावटीचे काम सुरू आहे. घर, दर्गा मशीद तसेच अन्य धार्मिक स्थळ, चौक, रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे.

मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील चौक मंडई, दूध बाजार, बागवानपुरा विविध ठिकाणी सजावटीचे दुकाने सजली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षाच्या तुलनेत यंदा मुस्लिम बांधवांमध्ये अधिक उत्साह असल्याने वस्तू खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

"ईद-ए-मिलाद निमित्ताने बाजारात विविध वस्तू विक्रीस उपलब्ध झाल्या आहे. दरांमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली नसून दर स्थिर आहे. झेंडे आणि पर्यावरण पूरक आकाश कंदीलची अधिक मागणी होत आहे. गेले दोन ते तीन वर्ष कोरोनाचे संकट होते. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने खरेदीसाठी मुस्लिम बांधवांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे."

- फरहान मिर्झा, विक्रेता

Muslim brothers shopping for various decorative items on the occasion of Eid-e-Milad.
Dhule Ganeshotsav News : पवनपुत्र गणेशमंडळातर्फे सजीव देखाव्यातून प्रबोधन

वस्तू दर (रूपयांमध्ये)

दीपमाळ, झुंबर १०० ते ३००

धार्मिक देखावा बलून २० ते २००

आकाशकंदील २०० ते ३००

चायना बलून २० ते १५०

पताका २० ते ५०

नालेन पाक ५० ते ३५०

बॅच ४० ते २०० डझन

चमकी, झुंबर ३५० ते ८०० फूट

Muslim brothers shopping for various decorative items on the occasion of Eid-e-Milad.
Nashik Ganeshotsav 2023: देखावे पाहण्यासाठी उसळली गर्दी! चांद्रयान 3 सह ऐतिहासिक, पौराणिक कथांवर भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.