जुने नाशिक : सूर्यनारायणाचे (Sunlight) दर्शन आणि पुराची (Flood) पातळी खालावल्याने कापड बाजार, सराफ बाजारसह मुख्य बाजारपेठ (Market) गजबजली.
नदीकाठावरील किरकोळ व्यावसायिकांनी पुरामुळे सराफ बाजारात आणून ठेवलेल्या दुकाने आपापल्या ठिकाणी नेऊन ठेवणे, तसेच दुकानांची स्वच्छता करत दुकानांमध्ये माल लावण्याचे काम दुपारपर्यंत सुरू असल्याचे बघायला मिळाले. (market was abuzz with sight of sunlight Nashik Latest marathi news)
शहरवासीयांना तब्बल दहा दिवसानंतर सूर्यनारायणाचे शनिवार (ता. १६) दर्शन घडले. दहा दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र व्यवहार ढेपाळले होते. त्यात गोदावरीस आलेल्या पुरामुळे व्यवसायिकांची झोप उडाली होती.
पुराचे पाणी दुकानात शिरूर नुकसान होईल या भीतीने अनेकांना व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली होती. तर, पावसामुळे नागरिकदेखील विविध खरेदीस बाहेर पडणे टाळत होते. त्यामुळे बाजारपेठा ठप्प होऊन व्यवसायांवर परिणाम झाला होता.
सराफ बाजारास लागून असलेल्या नदीकाठावरील किरकोळ दुकानदारांना बस आता पाऊस थांबला पाहिजे, अशी म्हणण्याची वेळ आली होती. सुदैवाने शनिवारी पावसाने उघडीप घेत सूर्यनारायणाचे दर्शन घडवून आणले.
त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. पुरामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सराफ बाजारात आणून ठेवलेल्या दुकाने संबंधित व्यावसायिकांनी आपापल्या जागेवर नेऊन ठेवल्या. सर्व व्यावसायिक मिळून एकमेकांची मदत घेत त्यांच्या दुकाने पूर्वनियोजित जागेवर उभे करण्याची धावपळ करताना दिसले.
सराफ बाजारातील भांडी, कपडे तसेच सराफ व्यावसायिकांनी दुकानाची स्वच्छता करत दुकानांमध्ये माल लावणे सुरू केले होते. दुसरीकडे ग्राहकदेखील दुकानांमध्ये खरेदी करताना आढळून आले.
मेनरोड, शालिमार, भद्रकाली मार्केट, दूध बाजारासह विविध बाजारपेठा पुन्हा ग्राहकांनी फुलून निघाल्या होत्या. नागरिकांची आवश्यक त्या वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली होती. एकूणच बहुतांशी परिस्थिती शनिवारी पूर्व पदावर आल्याचे दिसून आले.
रामसेतू पुलावर नागरिकांचा वावर
पुरामुळे रामसेतू पुलास तडे जाऊन दुरवस्था झाली आहे. महापालिकेकडून पुलास दोन्ही बाजूने बॅरेकेटिंग लावून रहदारीस बंद केला होता. शनिवारी नागरिकांनी बॅरिकेट बाजूला करत बांधलेल्या दोरी तोडून पुलाचा वापर सुरू केला. पायी ये जा करणे तर सोडा फेरीवाले आणि दुचाकी चालकांनीही पुलाचा पुरेपूर वापर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.