Nashik : आगीत विवाहाची शिदोरीची राख

Shidori destroyed by fire.
Shidori destroyed by fire.esakal
Updated on

जुने नाशिक : संत कबीरनगर झोपडपट्टीत शनिवार(ता. ६) लागलेल्या आगीत दोन महिन्यावर विवाह येऊन ठेपलेल्या नवरीची शिदोरी पूर्णपणे खाक झाली. मजुरी करणाऱ्या आईवडिलांनी वर्षभरापासून हळूहळू जमा केलेले सुमारे दोन लाखांचे साहित्य खाक झाले. आता कसे होणार, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. (marriage things burned in fire Nashik Latest Marathi News)

मदिना सादिक शेख यांच्या मुलीचा साखरपुडा ५ जूनला झाला आहे. पावसाळ्यानंतर तिचा विवाह होणार होता. येत्या काही दिवसांत विवाहची तारीख निश्चित करण्यासाठी पाहुणे मंडळी येणार होती. मुलीचा होणाऱ्या विवाहानिमित्त घरात उत्साहाचे वातावरण होते. शनिवारी झालेल्या अग्नितांडवातून त्यांचे घर सुटू शकले नाही.

घर जळाले, पण संसारोपयोगी साहित्यही खाक झाले. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. वर्षभरापासून संसाराचा गाडा हाकत उरेल, त्या पैशातून मुलीच्या विवाहसाठी नवीन भांडी, कपडे, पलंग, गादी, ब्लॅंकेट, कुलर, धान्य घेऊन ठेवले होते.

नवरी मुलीची आई मदिना शेख धुणे भांड्याचे काम करतात, तर वडील सादिक शेख हार्डवेअरच्या दुकानात काम करतात. दोघांच्या उत्पन्नातून संसाराचा गाडा हाकला जातो. त्यातच चारी मुलींना त्यांनी उच्चशिक्षित केले आहे.

Shidori destroyed by fire.
Dhule : खानदेशात कानबाई उत्सावाची धूम

एका मुलीचे लग्न झाले आहे. दुसरीचा दोन महिन्यानंतर विवाह होणार आहे. तर अन्य दोघी उच्च शिक्षण घेत आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना, मुलीच्या विवाहासाठी घेऊन ठेवलेली शिदोरी व शैक्षणिक साहित्य आगीत खाक झाले.

या वस्तूंची व्यवस्था होणार कशी, विवाहचा खर्च कसा करणार, अशा प्रश्नांनी शेख कुटुंबीयाची झोप उडाली आहे. आता या कुटुंबीयांना आस आहे ती शासकीय किंवा अन्य मदतीची. ती मिळाल्यास त्यांचे कुटुंब सावरण्यास मदत होईल.

"पोटाला चिमटा घेऊन हळूहळू जमवून ठेवलेली विवाहाची शिदोरीची आगीत पूर्णपणे राख झाली आहे. आता काय करावे, हे कळत नाही." -मदिना शेख, नवरी मुलीची आई

Shidori destroyed by fire.
Shravan 2022 : फुलांच्या दरात उसळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.