Nashik Crime News : छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासूवर गुन्हा दाखल

Nashik Crime News : छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासूवर गुन्हा दाखल
Updated on

Nashik Crime News : परिसरातील डीजीपीनगर येथील २९ वर्षीय विवाहिता अनिता पंकज गोठे यांनी राहत्या घरी उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचार सुरू असताना त्यांचा ४ सप्टेंबरला मृत्यू झाला. (Married woman commits suicide due to harassment nashik crime news)

दरम्यान, मृत अनिता गोठे यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत माहेरच्यांनी बुधवारी (ता. १३) अंबड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून मृत्यूस कारणीभूत पतीसह सासूवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.

मृत विवाहितेचे बंधू नितीन सीताराम निरभवणे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी संशयित पती पंकज एकनाथ गोठे, सासू बेबी गोठे यांच्यासह अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे, की संशयित पती पंकज, सासू बेबी यांनी मृत अनिता गोठे यांना वारंवार माहेरून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करून मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik Crime News : छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासूवर गुन्हा दाखल
Nashik Bribe Crime: शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लाचखोर लिपिक गजाआड; शाळेच्या शिपायाकडून घेतली 50 हजारांची लाच

संशयित पंकज गोठे याचे विवाहबाह्य संबंध असल्याने शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने अखेरीस अनिता यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची तब्येत खालावत असल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात उपचारांकरिता हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अनिता यांच्या मागे मुलगा व मुलगी आहे.

Nashik Crime News : छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासूवर गुन्हा दाखल
Hemant Parakh Kidnapping Case: वॉचमनच्या पोरानेच 2 कोटींसाठी रचला अपहरणाचा कट! राजस्थानातून तिघांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.