''...जमलं तर मला माफ करा'' चिठ्ठी लिहीत विवाहिता बेपत्ता

married woman Missing nashik
married woman Missing nashik esakal
Updated on

जुने नाशिक : टाकळी रोड तिग्रानिया कंपनी परिसरातून विवाहिता बेपत्ता झाली आहे. आपल्या नणंदेला काही वेळात जाऊन येते, असे सांगून निघून गेल्या, त्या अद्याप परतलेल्या नाही. दुपारी पती कामावरून घरी परतले असता त्यांना घडलेला प्रकार समजला. पतीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वहीमध्ये ठेवली चिठ्ठी

सोनल बागडे (३५), असे बेपत्ता विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी (ता. १) विवाहिता कपड्याने भरलेल्या दोन बॅग घेऊन घरातून निघून गेल्या. घरात शोधाशोध केली असता वहीमध्ये त्यांना एक चिठ्ठी सापडली.

married woman Missing nashik
बाहेरगावी जाताय, काळजी घ्या; परगावी गेलेल्यांच्या घरी घरफोडी

चिठ्ठीत लिहीले...

‘मी सोनल बागडे पूर्ण शुद्धीत हे लिहीत आहे की, मी हे घर सोडून जात आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये. यापुढे माझे जे काही होईल त्याला मी जबाबदार राहील. जमलं तर मला माफ करा'

असा मजकूर लिहिलेला आढळून आला. ते वाचून विवाहितेच्या पतीने परिसरात मित्रमंडळी, नातेवाइकांकडे शोध घेतला. त्या मिळून आल्या नाही. अधिक तपास पोलिस नाईक उत्तम पाटील करत आहे.

married woman Missing nashik
केळवा बिचवर टिपलेला फोटो ठरला अखेरचा; ३ तरुणांच्या मृत्यूने नांदगावात शोककळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.