Nashik News : शहीद जवान जनार्दन ढोमसे अनंतात विलीन; मरळगोई येथे अंत्यसंस्कार

Funeral procession of Jawan Janardhan Dhomse
Funeral procession of Jawan Janardhan Dhomseesakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : उगांव (ता. निफाड) येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (३२) यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्यवावर असतांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज (ता.२९) शोकाकुल वातावरणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

'भारत माता की जय, वीर जवान तुझे सलाम आदी घोषणांसह मरळगोई येथे साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. लाडक्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उगाव, मरळगोई तसेच लासलगावसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. (Martyred Jawan Janardhan Dhomse Cremation at Maralgoi Nashik News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Funeral procession of Jawan Janardhan Dhomse
Nashik News : मनमाडला रेल्वेच्या चाकात बिघाड; अनर्थ टळला

गुरुवारी (ता.२९) दुपारी दोनच्या सुमारास शाहिद जवान जनार्दन उत्तम ढोमसे यांचे पार्थिव देह लासलगाव शहरातील भगरीबाबा मंदिर येथे आणण्यात आले. फुलांनी व तिरंगा ध्वजाने सजविलेल्या भारतीय सैन्य दलाच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरवात झाली. अंत्ययात्रेत एनसीसीच्या विद्यार्थ्यांसह लासलगाव, उगाव, मरळगोई व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अंत्ययात्रा मरळगोई येथे पोहचल्यानंतर शहीद जनार्दन उत्तम ढोमसे यांच्या पार्थिवास त्यांचा मुलगा पवन (८) याने अग्नीडाग दिला. पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ व कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. शहीद जनार्दन उत्तम ढोमसे यांना भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. पोलिस प्रशासनातर्फे मानवंदना देण्यात आली.

निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णाताई जगताप, माजी सदस्य शिवा सुरासे, मरळगोईचे सरपंच निवृत्ती जगताप, लासलगावचे सहायक निरीक्षक राहुल वाघ, उगावचे माजी उपसरपंच साहेबराव ढोमसे, शिवसेनेचे प्रकाश पाटील, वसंत पवार, शिवाजी सुपनर आदींनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

Funeral procession of Jawan Janardhan Dhomse
Nashik News: आता UTS ॲपद्वारे काढता येणार रेल्वे तिकीट! 28 पथकांकडून भुसावळ विभागात जनजागृती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.