नाशिक : मास्टर मॉलच्या आगीवर 48 तासानंतर पूर्ण नियंत्रण

firefighters checking fire condition in master mall
firefighters checking fire condition in master mallesakal
Updated on

जुने नाशिक : मास्टर मॉलला लागलेल्या आगीवर (Fire) पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक (Firefighters) विभागास यश आले. सोमवारी (ता. २०) आगीच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्तांनी (NMC commissioner) रात्री घटनास्थळाला भेट देत रात्री सुमारे एकपर्यंत ठिय्या दिल्याने कामास गती आल्याचेही रहिवाशांकडून सांगण्यात आले. (Master Mall fire under complete control after 48 hours Nashik News)

गंजमाळ येथील मास्टर मॉलला रविवारी (ता. १९) सायंकाळी आग लागली होती. वरील तीन मजले आगीच्या कचाट्यात सापडले होते. अग्निशामक मुख्यालयसह सहाही विभागाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी हजर होते. दिवस- रात्र त्यांच्याकडून पाणी आणि फोमचा मारा करणे, तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम सुरू होते. अडचणीच्या ठिकाणी मॉल होता. व्हेंटिलेशन आणि आपत्कालीन मार्ग नसल्याने आग विजविण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. मॉलचा समोरील भाग तोडण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. परंतु इमारतीस त्यामुळे धोका निर्माण होण्याचे कारण देत त्यांना मज्जाव केला. सतत दोन दिवस आगीचा भडका सुरूच असल्याने आयुक्त रमेश पवार यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी (ता. २०) रात्री घटनास्थळाला भेट दिली.

आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय समोरील भाग तोडणे आवश्यक असल्याने ते तोडण्याच्या सूचना केल्या. खासगी पोकलेन यंत्र मागून इमारतीचा काही भाग तोडला. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवणे सुकर झाले. अग्निशामक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याची संधी मिळाल्याने रात्रीच बहुतांशी प्रमाणात आगीवर नियंत्रण आले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास आणि दुपारी एक वाजेच्या सुमारास बंदिस्त भागात पुन्हा आगीने भडका घेतला. परंतु, कर्मचाऱ्यांनी काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळविले. दुपारी चारनंतर प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांनी आत प्रवेश करत धगधगत असलेल्या आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर सायंकाळी पूर्ण नियंत्रण मिळविले. शहरात प्रथमच सतत ४८ तास आग सुरू असल्याची घटना असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

२ हजार लिटर फोमचा वापर

पाण्याचा मारा करूनदेखील आगीवर नियंत्रण येत नसल्याने अग्निशामक विभागाकडून पाण्यासह आगीवर फोमचा मारा करण्यात आला. सुमारे २ हजार लिटर फोमचा वापर करण्यात आला. गेल्या तीन दिवसापासून आग सुरू असल्याने मॉलला लागून असलेली झोपडपट्टी अर्थात भिमवाडी, सहकार नगरमधील रहिवासी हवालदिल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्याची माहिती मिळताच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आगीमुळे मॉल इमारतीची झीज झाली आहे. काही भागांना तडे गेले आहेत. धोकादायक अवस्थेत मॉल झाल्याने तो कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यास लागून असलेल्या झोपडपट्टीत जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

firefighters checking fire condition in master mall
शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी अन भाजप कार्यालयासमोर बंदोबस्त

निवृत्तीचे वय तरी जोमाने काम

अग्निशामक कर्मचारी संख्येची कमी या वेळी जाणवली. तर, दुसरीकडे मात्र अवघ्या काही वर्षात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वयाचा विचार करता जोमाने काम केले. ट्रेनी विद्यार्थ्यांची त्यांना चांगली साथ मिळाली.

firefighters checking fire condition in master mall
एक हाती कारभाराचा मनसे पॅटर्न शिवसेनेच्या मुळावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.