Nashik MD Drug Case: शिंदेगाव एमडी कारखान्याचा मास्टरमाईंड ललितच! ललित-भूषणच्या चौकशीतून स्पष्ट

lalit patil
lalit patilEsakal
Updated on

नाशिक : चाकणच्या गुन्ह्यात गोवण्यात आल्यानंतर, एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज तस्कारांच्या संपर्कात आलेल्या ललित पाटील याच्याच सांगण्यावरून त्याचा भाऊ भूषण याने शिंदेगावात एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरू केला.

एमडीच्या फार्मूल्यासाठी ललितच्या सांगण्यावरून अरविंद लोहारे व हरिश पंत यांनी भूषणला मदत केल्याचे दोन्ही भावांच्या समोरासमोरील चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

यातून त्यांनी १२ कोटींची कमाईही केल्याचे ललितने पोलिसांना सांगितले. (Mastermind of Shindegaon MD Factory Lalit patil Elucidated from Lalit Bhushans inquiry Nashik Drug Case Crime)

एमडी ड्रग्ज माफिया ललित पाटील व भूषण पाटील हे सध्या नाशिक शहर गुन्हेशाखेच्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून काही धक्कादायक माहिती नाशिक पोलिसांच्या हाती लागत आहेत.

चाकणच्या एमडी प्रकरणात ललितचा प्रत्यक्ष सहभाग नसताना, संशयित लोहारे यांच्या संपर्कात असल्याने अटक झाला होता. येरवडा कारागृहात असतानाच लोहारेकडून त्याने एमडी कारखाना सुरू त्याच्या विक्रीचा प्लॅन आखला.

त्यासाठी ललितनेच त्याचा भाऊ भूषण यास तयार केले आणि लोहारेच्या सांगण्यावरून हरिश पंत याने एमडीचा फॉर्म्यूला भूषणला दिल्याचे ललितने पोलिसांना सांगितले. हरिष आणि जिशान यांच्याच नेतृत्वाखाली शिंदेगावात डिसेंबर २२ मध्ये पहिला कारखाना सुरू केला.

त्यासाठी हरिषनेच कच्चा माल पुरवला. मात्र त्यांचा एमडी ड्रग्जचा पहिला लॉट रिजेक्ट झाला होता. त्यानंतर पुन्हा एमडी ड्रग्ज तयार करून त्याची तस्करी स्वत: हरिष व जिशान यांनी करीत त्याची विक्री पुणे, ठाणे आणि मुंबईत केली.

त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २३ मध्ये दुसरा कारखाना शिंदेगावात सुरू केला. या दोन्ही कारखान्यात ते महिन्यातून फक्त आठ ते दहा दिवसच काम करायचे. त्यानंतर कारखाना बंद ठेवून ते ड्रग्जची विक्री करीत असल्याचे पोलिसांना सांगितले.

lalit patil
Nashik MD Drug Case: एमडी ड्रग्‍ज कारखाना उभारणीसह विक्रीत हरिशपंतचा सहभाग उघड

१२ कोटी कमावले

शिंदेगाव एमडी ड्रग्ज कारखाना सुरू करून ललित पाटील याने १२ कोटी रुपये कमावले. परंतु त्यातून सर्वांचे हिस्सेदारीतून त्याच्या वाट्याला आलेल्या पैशातून त्याने सोने-चांदी खरेदी केली होती.

तसेच, ससून रुग्णालयात राहत असताना त्याचा खर्चच लाखो रुपये असल्याचे ललितने पोलिसांना सांगितले.

आणखी दोघांचा शोध

ललित, भूषण, अभिषेक बलकवडे, हरिष पंत, रोहित चौधरी व जिशान यांच्या चौकशीतून आणखी दोघा संशयितांची नावे समोर आली आहेत.

शहर गुन्हेशाखा आणि अंमलीपदार्थ विरोधी पथक त्या दोघांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असून, लवकरच त्यांना अटक केली जाणार आहे.

भूषण-अभिषेक पुण्याकडे रवाना

भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहाकडे करण्यात आली आहे

lalit patil
Nashik MD Drug Case: सामनगाव ‘एमडी’ ड्रग्ज टोळीचा मास्टरमाइंड वाघ अखेर जेरबंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()