Accident News : शहरांप्रमाणेच खेड्यापाड्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे पोहोचल्याने वाहनांची संख्याही वाढली. चकाचक रस्त्यांमुळे वेगही वाढला. परंतु, वाहन चालविताना वाहतूक नियमांचा जाणीवपूर्वक विसर पडल्याने अपघातांची संख्या वेगाने वाढत आहे.
परिणामी, राज्यात गेल्या सात महिन्यांत सर्वाधिक ५७८ अपघाती मृत्यू नाशिकमध्ये झाले. महाराष्ट्रात रस्ता अपघातांत १५ हजार २२४ मृत्यू झाले असून, देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेषत: दुचाकी अपघाती मृत्युंमध्ये हेल्मेट न घातल्याने सर्वाधिक मृत्यू झाले. तर, समृद्धी महामार्गावरील अपघातातील १०१ बळी हे मनुष्य चुकीमुळेच गेले आहेत. (Maximum 578 accidental deaths occurred in Nashik news)
रस्ता अपघातांत बळी जाण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. जगभरातील रस्ता अपघातांत वर्षाला १३ लाख मृत्युमुखी पडतात, तर भारतात एक लाख ५३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
एकीकडे विकासासाठी रस्त्यांची निर्मिती होत असताना दुसरीकडे हेच रस्ते वाहतूक नियमांचे पालन वाहनचालकांकडून होत नसल्याने मृत्युचे सापळे बनले आहेत. रस्ते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्रातही महामार्ग वाहतूक पोलिस विभागामार्फत जनजागृतीसह वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
देशभरातील अपघातांची आकडेवारी (२०२१)
राज्य ........ अपघातांची संख्या.......अपघाती मृत्यू
तमिळनाडू......५५,६८२......१५,३८४
मध्य प्रदेश.......४८,८७७......१२,०५७
उत्तर प्रदेश.......३७,७२९......२१,२२७
महाराष्ट्र........२९,४७७......१३,५३८
२०२२ मध्ये
महाराष्ट्र.......३३,३८३.......१५,२२५
देशभरातील दुचाकी अपघात (२०२१)
राज्य.....अपघाती मृत्यू
तमिळनाडू....९,३९२
महाराष्ट्र......६,९४३
उत्तर प्रदेश.....६,८०३
मध्य प्रदेश.....५,७४२
कर्नाटक......४,९३८
२०२२ मध्ये
महाराष्ट्र .....७,७३३
महाराष्ट्रातील अपघाती मृत्यू (कंसात अपघाती संख्या)
वर्षे २०२१
शहर......मृत्यू
नाशिक.....८६२ (१,४२९)
पुणे.......७९८ (१,३६३)
नगर......७०६ (१,३६०)
सोलापूर....५५३
जळगाव... ५२७
वर्ष- २०२२
पुणे.....९२३ (१,६३४)
नाशिक...९१२ (१,४६२)
नगर....८४१ (१,६१६)
सोलापूर...६४१
जळगाव...५५२
वर्ष- जुलै २०२३
नाशिक.....५७८ (९१४)
पुणे.......५३२ (९८८)
नगर......५१० (१,०३५)
सोलापूर....४०१ (७०६)
सातारा.....२९५
समृद्धी महामार्गावरील अपघात
(११ डिसें. २२ ते ३१ जुलै २३ पर्यंत)
अपघात..... मृत्यू.......जखमी
७२९........१०१........२६२
मुंबई-आग्रा महामार्गावरील अपघात
वर्ष.....अपघात.....मृत्यू
२०२१....४१३.......४७२
२०२२....४४२.......४८१
२०२३....१८०.......१९८ (मेअखेर)
ब्लॅकस्पॉट
राज्य- १००१
नाशिक शहर- २३
नाशिक ग्रामीण- ३९
अपघात टाळण्यासाठी
- ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून चालकांमध्ये वाहतूक नियम व वेगमर्यादेबाबत जनजागृती
- रस्त्यांवरील अपघातस्थळी ब्लिंकर्स, दिशादर्शक व वेगमर्यादेचे फलक, धोकादायक वळणावर फलक
- भरवस्ती वा शहरातून अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी
- शहराबाहेर अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनल्सबाबत प्रस्ताव देणार
- दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती
- अपघात टाळून ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी विशेष जनजागृती
"रस्ता अपघाती मृत्यूला वाहतूक नियमांचे उल्लंघन, वेगाची अमर्यादा कारणीभूत आहे. हे रोखण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती व प्रबोधनात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी नागरिक, वाहनचालकांसह सर्वांचा सहभाग आणि सहकार्याची आवश्यकता आहे." - डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अप्पगर पोलिस महासंचालक, महामार्ग वाहतूक पोलिस विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.