Mahavitaran: ‘महावितरण’तर्फे रोखीने बिल भरण्यासाठी कमाल मर्यादा! ऑगस्टपासून रोखीने एवढेच बिल भरता येणार!

Mahavitaran
Mahavitaranesakal
Updated on

Mahavitaran : वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून ‘महावितरण’च्या वीजबिल रोखीने पाच हजार रुपयांपर्यंत बिल भरता येणार आहे.

ऑनलाइन बिल भरणा वाढविण्यासाठी रोखीने पैसे भरण्यावर कमाल मर्यादा राहणार असून, त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पद्धतीने वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे. (Maximum limit for cash bill payment by Mahavitaran Only 5000 amount can paid in cash from August)

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून ‘महावितरण’च्या सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ पाच हजार रुपयांपर्यंतचे वीजबिल भरता येणार आहे.

तसेच, लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहील.

‘महावितरण’तर्फे वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच ‘महावितरण’च्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येऊ शकतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Mahavitaran
Nashik News: संदर्भसेवा रुग्णालयातील ‘कॅथलॅब’ दुरुस्तीला 10 लाख

‘महावितरण’च्या संकेतस्थळावर ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/ डेबिट कार्ड, नेटबँकिंग व यूपीआय आदी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करू शकतो.

‘महावितरण’तर्फे पाच हजारांहून अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस, एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीजबिल भरणा निःशुल्क आहे.

ऑनलाइन पद्धतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००) इतकी सवलत आहे. ‘महावितरण’चे ११० लाख ग्राहक (६५ टक्के) ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत असून, यातून दरमहा ‘महावितरण’ची साधारणतः दोन हजार २५० कोटी महसुलाची वसुली होते.

Mahavitaran
Nashik Dengue Update: जिल्ह्यात डेंगीचे 20 रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.