नाशिक : महापालिकेने जागतिक पातळीवर स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केल्यास पुरवठा होईपर्यंत दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल तोपर्यंत केंद्र व राज्य शासनाची लस उपलब्ध होईल. त्यामुळे लसींचा साठा पडून राहील. लस सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोल्ड स्टोरेजची आवशक्यता भासेल. त्यामुळे तत्काळ शहरासाठी लस (Vaccine) उपलब्ध होण्यासाठी मुंबई व ठाणे महापालिकेच्या जागतिक पातळीवरच्या निविदा प्रक्रियेत (global tender) सहभागी होवून लसींची मागणी केली जाणार आहे. साधारण पाच लाख लसींची मागणी नोंदविली जाईल अशी माहिती आयुक्त कैलास ((Kailas Jadhav) जाधव यांनी दिली. (mayor said that the demand for five lakh vaccines will be registered for Nashik city)
सोळा जानेवारीपासून शहरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिला डोस घेणायांची संख्या मोठी असताना दुसरा डोससाठी देखील प्रतिक्षा यादी वाढली आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मागणीच्या तुलनेत अपुरा साठा उपलब्ध होत असल्याने व उपलब्ध झालेला साठा फक्त दोन दिवस पुरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेने स्वखर्चाने लसीकरण करण्याच्या संकल्पनेला मुर्त स्वरुप देण्यासाठी मंगळवारी (ता. १८) आयुक्त कैलास जाधव यांच्या दालनात प्रमुख पदाधिकायांची बैठक झाली. महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृह नेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, कॉंग्रेस गटनेते शाहु खैरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते गजानन शेलार, रिपाई गटनेत्या दिक्षा लोंढे आदी उपस्थित होते. पदाधिकायांच्या सुचना जाणून घेतल्यानंतर आयुक्त जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधतं माहिती दिली.
लस वेळेत मिळेल का?
लस प्राप्त करण्यासाठी राज्य शासन देखील वेटींग वर आहे. नाशिक महापालिकेला लस खरेदी करण्यात निधीची अडचण नाही. मात्र जागतिक पातळीवर निविदा काढल्यानंतरही लस वेळेत मिळेल का? हा प्रश्न आहे. जुन, जुलै मध्ये कोरोना संसर्ग उतरणीला लागेल. महापालिकेने जागतिक पातळीवर निविदा काढून लस खरेदी केल्यास त्याचवेळी केंद्र व राज्य शासनाकडून लस उपलब्ध झाल्यास अतिरिक्त साठा होईल. त्यामुळे मुंबई, ठाणे महापालिकेने जागतिक पातळीवर प्रसिद्ध केलेल्या निविदेत सहभागी होवून या महापालिकांकडूनचं लस मागविली जाईल अशी माहिती आयुक्त जाधव यांनी दिली.
पाच लाख लसींची गरज
सन २०११ च्या लोकसंख्येनुसार १४ लाख लोकसंख्येचे लसीकरण आवशक्य आहे. सध्या तीन लाखांपेक्षा अधिक लसीकरण पूर्ण झाले आहे. केंद्र व राज्य शासनाकडून देखील लस उपलब्ध होणार असल्याने मुंबई व ठाणे महापालिकेकडे पहिल्या टप्प्यात पाच लाख लसींची मागणी नोंदविणार आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर १८ ते ४४ वयोगटाला प्राधान्य दिले जाईल.
वेळेत लस उपलब्ध होण्यासाठी मुंबई, ठाणे महापालिकांच्या जागतिक निविदेत सहभागी होवून लसींची गरज भागविली जाणार आहे. त्यासंदर्भात दोन्ही महापालिका आयुक्तांशी चर्चा करू.- कैलास जाधव, आयुक्त.
कोरोना बाधित रुग्णसंख्येचा विचार करता नाशिक महापालिकेला लसीकरणासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे. तुटवडा लक्षात घेता व वेळेत बंधन लक्षात घेवून स्वखर्चाने लस घेतली जाणार आहे. - सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.