Nashik MD Drug Case: जाता-जाता आयुक्तांनी लावला एमडी ड्रग्ज टोळीला मोका; पोलिस पथक मुख्य सूत्रधारांच्या मागावर

Drugs Crime
Drugs Crimeesakal
Updated on

Nashik MD Drug Case: सामनगाव येथील एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज विक्री प्रकरणातून उघड झालेल्या सनी पगारे-अर्जुन पिवाल टोळीला नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीचे मुख्य सूत्रधार अद्यापही फरारी आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता. २१) पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीचे आदेश आले.

आपल्या कार्यकाळात सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणारे आयुक्त शिंदे यांनी जाता-जाता पगारे-पिवाल या ड्रग्जमाफिया टोळीविरोधात ‘मोका’ची कारवाई केली आहे. शिंदे यांच्याच कार्यकाळात गुन्हेगारांविरोधात सर्वाधिक प्रतिबंधात्मक, तडीपारी आणि मोकाची कारवाई झाली आहे. (Mcoca action against drug mafia gang nashik md crime news)

सामनगाव येथे ७ सप्टेंबरला गणेश शर्मा यास नाशिक रोड पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करताना अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हे शाखा आणि अमली पदार्थविरोधी पथकाने करताना ड्रग्जमाफियांची टोळीच गजाआड केली. या टोळीचा म्होरक्या सनी पगारे व अर्जुन पिवाल यांचे सोलापुरातील एमडी ड्रग्जचे दोन कारखानेही उद्‌ध्वस्त करीत लाखोंचा साठा व साहित्य जप्त केले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत ११ संशयितांना नाशिक पोलिसांनी अटक केली. या टोळीचे मुख्य सूत्रधार असलेले दोन ते तीन संशयित अद्यापही फरारी आहेत. त्यांना अटक करण्यासाठी शहर गुन्हे शाखा व अमली पदार्थविरोधी पथके मागावर आहेत; परंतु ते सतत पोलिसांच्या पथकाला हुलकावणी देत आहेत.

पोलिस आयुक्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणातील सामनगाव, शिंदे गाव आणि वडाळा गाव या तिन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू होता. नाशिक पोलिसांनी पगारे-पिवाल टोळीतील ड्रग्ज पेडलर्सला अटक करताना सोलापुरातील दोन कारखाने उद्‌ध्वस्त केले.

Drugs Crime
Nashik MD Drug Case: ‘एमडी’ अमली पदार्थ विक्रीत संशयित गणेश शर्मा गजाआड

तसेच, त्याठिकाणी ड्रग्ज बनविणाऱ्या संशयितालाही पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात अटक असलेल्या ११ संशयितांविरोधात आयुक्त शिंदे यांनी ‘मोका’ लावला आहे. मंगळवारी श्री. शिंदे यांच्या बदलीचे आदेश आले. मात्र, जाता-जाता त्यांनी ही कारवाई केली.

गुन्हेगारीविरोधात बेधडक कारवाई

शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आयुक्त शिंदे यांनी दरोडाविरोधी पथक, खंडणीविरोधी पथक, शस्त्र व गुंडाविरोधी पथक, अमलीपदार्थविरोधी पथक ही आयुक्तालयात नव्याने पथके सुरू केली होती.

त्यामुळे गुन्हेगारीविरोधात धडक कारवाई करताना दोनपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांवर तडीपारी व स्थानबद्धतेची कारवाई केली. गेल्या ११ महिन्यांत पाच टोळ्यांविरोधात ‘मोका’न्वये कारवाई केली. त्याच्या या बेधडक कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांसह राजकीय गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला होता.

‘मोका’ लावण्यात आलेली पगारे-पिवाल टोळी

सनी पगारे, अर्जुन पिवाल, वैजनाथ सुरेश हावळे, गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सुमीत पगारे, मनोज गांगुर्डे, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे, मनोहर काळे, प्रथमेश मानकर.

Drugs Crime
Nashik MD Drug Case: ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयितांचा शोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.