Nashik MD Drug Case: ललित पाटीलसह तिघांना 10 दिवसांची कोठडी; पोलिसांच्‍या चौकशीकडे लक्ष

Drugs Crime
Drugs Crimeesakal
Updated on

Nashik MD Drug Case: शिंदे गावातील एमडी (मफेड्रोन) प्रकरणातील मुख्य संशयित ललित पाटील (पानपाटील) याला शनिवारी (ता. ९) न्‍यायालयात हजर करण्यात आले. सखोल चौकशीसाठी ललितसह इतर तिघांना न्‍यायालयाने दहा दिवसांची (१८ डिसेंबरपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.

एमडी ड्रग्‍जचे उत्‍पादन, विक्रीचे धागेदोरे तसेच आर्थिक उलाढाल, इतर संशयितांचा शोध घेण्याच्‍या दृष्टीने पोलिसांच्‍या चौकशीकडे लक्ष लागून राहील. दरम्‍यान, यापूर्वी अटक केलेल्‍या शिवा शिंदेला न्यायालयीन कोठडी सुनावल्‍याने त्‍याला मध्यवर्ती कारागृहात रवाना केले आहे.

राज्‍यस्‍तरावर खळबळ माजवलेल्‍या एमडी ड्रग्‍ज प्रकरणाची पाळेमुळे नाशिकमध्येही परसरलेली होती. ()

शिंदे गावातील कारवाईत शहर पोलिसांनी तब्‍बल पाच कोटी ८४ लाख ४० हजार रुपये मूल्‍याचे सुमारे पाच किलो एमडी ड्रग्‍ज आणि कच्चा माल हस्‍तगत केला होता. चौकशीअंती गुदामाची नोंद संशयित शिवा अंबादास शिंदे याच्या नावावर असल्‍याचे आढळले. यानंतर पोलिसांनी शिवाला अटक केली होती.

कारवाईचा धडाका सुरू ठेवताना पोलिसांनी भूषण पानपाटील, अभिषेक बलकवडे या दोघांनाही गजाआड केले. मुख्य सूत्रधार ललित पाटील (पानपाटील) याच्यासोबत रोहित चौधरी, झिशान शेख, हरिश्‍चंद्र पंत यांचा मुंबई पोलिसांकडून नाशिक शहर पोलिसांनी ताबा घेतला. सर्व संशयितांना पोलिसांनी शनिवारी न्‍यायालयात हजर केले. सुनावणीदरम्‍यान न्यायालयाने संशयित शिवाला न्यायालयीन कोठडी सुनावली; तर इतर चौघांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Drugs Crime
Lalit Patil Drugs Case: ड्रग तस्करांशी हातमिळवणी करणाऱ्या पोलिसांवर काय होणार कारवाई ? फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती

ही कारवाई पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्‍हे शाखा) प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, सहाय्यक निरीक्षक हेमंत फड, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार चंद्रकांत बागडे, गणेश वडजे, संजय ताजणे, अनिरुद्ध येवले, डी. के. पवार यांच्या पथकाने कारवाई केली.

दहा दिवसांची कोठडी मंजूर

या प्रकरणात एमडी ड्रग्‍स बनविण्याचा फॉम्‍युला संशयितांना कोठून मिळाला, त्‍यांनी केलेल्‍या आर्थिक व्‍यवहारांच्या व्‍याप्तीसह इतर तपास करण्याच्‍या अनुषंगाने संशयित ललितसह इतर चौघांना दहा दिवस पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकार पक्षातर्फे ॲड. पंकज चंद्रकोर यांनी केली. दोन्‍ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर न्यायाधीश एम. आय. लोकवाणी यांनी दहा दिवस पोलिस कोठडी मंजूर केली.

Drugs Crime
Lalit Patil Drug Case: ड्रग्स माफिया ललित पाटील नाशिक पोलिसांच्या ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()