Nashik Drug Case : मुंबई व नाशिक पोलिसांनी एम. डी. ड्रग्ज प्रकरणात आढळून आलेल्या कंपनीबाबत कुठलीच नोंद उद्योग विभागासह इतर सरकारी यंत्रणांकडे नसल्याचा प्रश्न ‘सकाळ’ने उपस्थित करताच मंत्रालय स्तरावरून फॅक्टरी आणि अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. (md Drug Case Patil illegal company is being investigated nashik crime news)
शिंदे येथील गणेशाय इंडस्ट्रीज ही कंपनी बनावट असून, या कंपनीबाबत कुठलीच नोंद उद्योग विभागासह इतर सरकारी यंत्रणांकडे नाही. याबाबत ‘सकाळ’ने प्रश्न उपस्थित करताच मंत्रालय स्तरावरून फॅक्टरी आणि अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कारखाना विभागाचे के. टी. झोपे व अंजली आडे यांनी चौकशी सुरू केली. सरपंच, ग्रामसेवक, अन्न व औषध विभाग आणि नार्को टेस्ट आदींना पत्र पाठवून सविस्तर माहितीचा अहवाल मागितला जात आहे. यात सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष कसे झाले, याबाबत तपास यंत्रणा गुप्त माहिती घेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.