Nashik MD Drug Case : सामनगावच्या एमडी ड्रग्ज गुन्ह्याचे कनेक्शन सोलापूरपर्यंत पोहोचले असून, नाशिक पोलीसांनी कारखानाच उदध्वस्त केला आहे.
तर, वडाळागावातील कनेक्शन मुंबईपर्यंत पोहोचले असून, नाशिक पोलिसांनी छोट्या भाभीच्या पतीला एमडी ड्रग्ज विकणाऱ्यास अटक केल्यानंतर नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणखी एकाला मुंबईतून अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे. (MD drugs peddler arrested from Mumbai Wadalas Mumbai drug connection nashik crime)
शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजिज मेमन (रा. मुंबई) असे मुंबईतून अटक करण्यात आलेल्या एमडी ड्रग्ज पेडलरचे नाव आहे. नाशिक शहर गुन्हेशाखेच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने वडाळागावात एमडी ड्रग्जविरोधात कारवाई करीत छोटी भाभी उर्फ नसरीस शेख हिच्यासह एकाला अटक केली होती.
तिच्याकडील फोन जप्त केल्यानंतर पोलिसांनी तिचा पती राजा उर्फ इम्तियाज याला अटक केली. इम्तियाजच्या चौकशीतून तो मुंब्रातून (जि. ठाणे) एमडी ड्रग्ज नाशिकला आणत असल्याचे समाेर आले असता, पथकाने सलमान शकील अहमद फाळके (३०, रा. ठाणे) यास शिताफीने सापळा रचून अटक केली होती.
त्यामुळे छोट्या भाभीचे ड्रग्ज कनेक्शन मुंबई असल्याचे निष्पन्न झाल्याने अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून हे रॅकेट उघड करण्यासाठी तपास सुरू होता.
अटकेतून संशयितांच्या तपासातून सलमान हा मुंबईतील शब्बीर उर्फ आयना याच्याकडून एमडी ड्रग्ज घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने मुंबई गाठून संशयित शब्बीर याचा शोध सुरू केला.
त्याचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ठावठिकाणा शोधून काढत अखेर त्यास मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयात शनिवारी (ता. २८) हजर केले असता, त्यास बुधवारपर्यंत ( ता. १ नोव्हेंबर) पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक दिवणासिंग वसावे, सहायक निरीक्षक हेमंत नागरे, हेमंत फड यांच्यासह पथकाने केली आहे.
मुंबईतील पेडलर गायब
वडाळ्यातील एमडी ड्रग्जची कारवाई केल्यानंतर पोलीस कारवाईच्या भितीने मुंबईतील नाशिकला एमडी ड्रग्जचा पुरवठा करणारे पेडलर्स गायब झाले आहेत.
पोलिसांनी छोट्या भाभीला अटक केल्याने तिच्या पतीला ताब्यात घेणे सोपे झाले असले तरी, त्यापुढील रॅकेटला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना चांगलीच मेहनत घ्यावी लागते आहे.
याप्रकरणात आत्तापर्यंत पाच संशयित अटक झाले असून, हे रॅकेट मोठे असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
इम्तियाजमुळे सलमान आणि सलमानमुळे शब्बीरला अटक झाली असली तरी त्यापुढील रॅकेटमधील पेडलर्सला अटक करण्यासाठी पोलिसांनी मुंबईत कसून शोध घ्यावा लागतो आहे. त्यातच काही संशयित हे राजकीय नेत्यांच्या संपर्कातील असल्याचेही बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.