Nashik MD Drug Case : एमडी अमली पदार्थाच्या वितरणात पोलिसांनी शुक्रवारी (ता. १७) आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या. प्रथमेश संजय मानकर असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान आज या प्रकरणात मुंबई आणि धुळ्यात कारवाया झाल्या.
नाशिकचे पथक मुंबईत तपासात व्यस्त होते त्यामुळे मुंबई पोलिसांकडून धुळ्यात कारवाई झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (MD Ganesh Sharma suspected of drug sales arrested nashik crime news)
या ठिकाणी एक कंपनी सील करण्यात आल्याची चर्चा पोलिस पथकात होती. नाशिक रोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी शुक्रवारी सामनगाव परिसरातील म्हाडा बिल्डिंगजवळ राहणारा गणेश संजय शर्मा हा एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून नाशिक रोड पोलिस ठाण्यातील अंमलदार यांनी म्हाडा बिल्डिंगचे गेटसमोर अश्विनी कॉलनीकडे जाणारे रस्त्यालगत त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५० हजारांचा सुमारे १२.०५ ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ हस्तगत केला. अमली पदार्थविरोधी पथकाला गुन्ह्याच्या तपासात प्रथमेश संजय मानकर याचे नाव निष्पन्न झाल्याने संबंधित गुन्ह्यात आणखी उकल होण्याची आशा आहे.
मुंबई-धुळ्यात कारवाई
या प्रकरणात पोलिसांकडून आज मुंबई आणि धुळ्यात पोलिस कारवाई झाल्याच्या चर्चा आहे. मात्र नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धुळ्यातील कारवाईबाबत मौन पाळले. गुन्हे शाखेकडून धुळ्यात कुठलीही कारवाई झालेली नसल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.