Nashik: नाशिकमध्ये पुन्हा 6 कोटींचा ‘एमडी’ जप्त! ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाऊ : पोलिस उपायुक्त मोनिका राऊत

Deputy Commissioner of Police Monika Raut showing the materials seized at Nashik Road Police Station after the MD drug manufacturing factory was demolished.
Deputy Commissioner of Police Monika Raut showing the materials seized at Nashik Road Police Station after the MD drug manufacturing factory was demolished.esakal
Updated on

Nashik News : नाशिक व नाशिक रोड येथील ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित आरोपींची पाळेमुळे खोदून काढू. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल, यासाठी या प्रकरणाची वेगवेगळ्या पद्धतीने, अँगलने आम्ही चौकशी करीत आहोत.

या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करू, अशी ग्वाही पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी रविवारी (ता. ८) येथे पत्रकार परिषदेत दिली. (MD worth 6 crores seized again in Nashik Get to root of drug case Deputy Commissioner of Police Monika Raut Nashik)

नाशिक रोड परिसरातील शिंदे गाव येथे शनिवारी (ता. ७) सायंकाळी गुदामावर टाकलेल्या छाप्यात सहा कोटी रुपयांचा ‘एमडी’ माल जप्त करण्यात आला होता. या संबंधित त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

त्या म्हणाल्या, ‘‘पाच दिवसांपूर्वी पुणे येथे ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील हा फरारी झाला होता. त्याचा पोलिस वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेत आहेत.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी शिंदे गाव एमआयडीसी परिसरात असलेल्या ड्रगच्या कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचा ‘एमडी’ जप्त केला होता. हा कारखाना चालविणारा ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील हा फरारी झाला आहे.

याचा तपास सुरू असताना शनिवारी पुन्हा शिंदे गाव परिसरातील एका ठिकाणी नाशिक रोड पोलिसांनी छापा टाकून तेथे असलेल्या व ड्रग बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या गुदामातून सुमारे सहा कोटी रुपयांचा माल जप्त केला.

Deputy Commissioner of Police Monika Raut showing the materials seized at Nashik Road Police Station after the MD drug manufacturing factory was demolished.
Nashik Drug Case: शिंदे गावातून आणखी 3 किलो एमडीचा साठा जप्त; नाशिकरोड पोलिसांची कारवाई

भाड्याने घेतले होते गुदाम

शिंदे गाव परिसरातील दत्तू वामन जाधव (रा. जुना ओढा रोड, खर्जुल मळा, नाशिक रोड) यांनी पोलिसांना माहिती दिली, की संजय काळे नावाच्या व्यक्तीला शेतीसाठी लागणारी औषधे, कच्चा माल ठेवण्यासाठी दरमहा पाच हजार रुपये भाड्याने जागा दिलेली होती; परंतु सध्या तो गाळा बंद असून, याबाबत शंका निर्माण झाली आहे.

यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास वांजळे, सहाय्यक निरीक्षक हेमंत फड, गणेश शेळके, सुवर्णा हंडोरे आदींनी शिंदे गाव एमआयडीसी ठिकाणी फॉरेन्सिक टीमसह छापा टाकला.

तेथे चार हजार ८७० किलोग्रॅम वजनाचा पाच कोटी ८४ लाख ४० हजार रुपये किमतीचा पिवळसर रंगाचा पावडर स्वरूपाचा असलेला ‘एमडी’ नावाचा अमली पदार्थ व १२ हजार रुपये प्रतिग्रॅम वजनाचा पदार्थ पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीत मिळून आला.

या गुदामातून ‘एमडी’ तयार करण्याचे रसायन व इतर साधनसामग्री असा सुमारे पाच कोटी ९४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Deputy Commissioner of Police Monika Raut showing the materials seized at Nashik Road Police Station after the MD drug manufacturing factory was demolished.
Nashik MD Drug Case: नाशिक बनतेय MDचा अड्डा? औद्योगिक वसाहतीतील गाळ्यांवर करडी नजर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.