नाशिक : मागील आठवड्यामध्ये शहरात एकही गोवरचा रुग्ण आढळला नसल्याचा दावा करत स्वतःची पाठ थोपटणाऱ्या वैद्यकीय विभागाला चार रुग्णांवर गोवरचा संशय असल्याने या चारही रुग्णांचे रक्ताचे नमुने मुंबईच्या हाफकिन लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे. वैद्यकीय विभागाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. (Measles Disease in city 4 Samples of suspected infected to Haffkine Lab Mumbai Nashik News)
दोन वर्षांपासून कोविडचा सामना करणाऱ्या नाशिककरांना चालू वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले गेले असताना वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात गोवरने नाशिकच्या दारावर टकटक केल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात मुंबई शहरामध्ये गोवरची साथ पसरली. गोवरच्या या साथीमुळे अनेक मुले व्हेन्टिलेटर वर गेली. संसर्गजन्य या आजाराचा प्रसार मुंबईनंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये होण्यास सुरवात झाली. मुंबई शहरात गोवरमुळे तीन मुलांचा मृत्यू झाला. त्या व्यतिरिक्त राज्यात इतर कोठेही मोठ्या प्रमाणात उद्रेक दिसून आला नाही.
मालेगावमध्ये आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर गेली. नाशिकमध्ये मागील आठवड्यापर्यंत गोवरचा एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे नाशिककरांनी काही प्रमाणात सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, वैद्यकीय विभागाकडून शहरात गोवरची लक्षणे असलेली मुले शोधण्याचे काम सुरू होते. यात चार संशयित रुग्ण आढळले. संशयित बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईच्या हाफकिन लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे. त्या रक्त नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गोवर संदर्भात नाशिकमध्ये निष्कर्ष निघेल.
डॉ. हुसेन रुग्णालयात संसर्गजन्य कक्ष
कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात संसर्गजन्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयातील बालरोग कक्षातदेखील गोवरच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. मात्र, अद्याप नाशिकमध्ये गोवरचा एकही रुग्ण आढळला नसल्याने घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
"वैद्यकीय विभागाच्या सर्वेक्षणामध्ये चार बालके गोवर संशयित आढळले. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने मुंबईत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे."
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.