मालेगाव : शहरात लसीकरणाबाबत असलेली अनास्था चिंतेची बाब आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी धर्मगुरु व धार्मिक संघटनांनी नागरिकांमध्ये जनजागृती करावी. लसीकरण आजारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी हिताचे आहे. हे पालकांच्या मनावर बिंबवावे, असे आवाहन आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले.
शहरात गोवर साथ रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका सभागृहात झालेल्या मुस्लीम धर्मगुरु व धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी शहरात गोवरबाधित ५६ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ११ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. उपचाराने हे रुग्ण लवकरच बरे होतील. गोवरने आतापर्यंत एकही बालमृत्यू झालेला नाही. महापालिका आरोग्य विभागाने सर्व उपाययोजना करताना बालकांचे लसीकरण सुरु केले आहे. मुंबई शहरात गोवर रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथे काही रुग्ण दगावले आहेत.
हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....
मालेगाव शहरात रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. बाधित बालकांवर उपचार सरु आहेत. लसीकरणावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. काही नागरिक लसीकरणास विरोध करतात. अशा ठिकाणी धर्मगुरुंनी पुढाकार घ्यावा. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने २०११ मध्ये शहर पोलिओ मुक्त झाले. त्याचप्रमाणे आताही लसीकरणासाठी सवांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी. गोवरच्या संकटावर आपण मात करु, असा विश्वास गोसावी यांनी व्यक्त केला.
श्रीमती ठाकरे यांनी घरोघरी जाऊन बालकांचे सर्वेक्षण सुरु आहे. ७२६ बालकांची तपासणी केली आहे. ज्या ९ ते १८ महिन्याच्या बालकांना गोवर लस दिली नसेल त्यांना पालकांनी जवळील नागरी आरोग्य केंद्र, अंगणवाडी व नियमित लसीकरण होणाऱ्या मदरसामध्ये नेऊन लस द्यावी. आरोग्य विभागाने केलेल्या लसीकरण व उपचार नियोजनाची माहिती दिली. डॉ. अमोल दुसाने यांनी क्षय रोगाबाबत माहिती दिली.
या वेळी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, उपायुक्त सुहास जगताप, सहाय्यक आयुक्त सचिन महाले, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नांदापूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश थेटे, लसीकरण सहनियंत्रक जगदीश जाधव, अब्दुल कय्युम कासमी, मौलाना इम्तियाज इक्बाल, कारी इकलाख जमाली, फकीर मोहम्मद, डॉ. इकलाख अन्सारी, कारी अहमद जलिली आदींसह धार्मिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.