Measles Rubella Vaccination : पहिल्या दिवशी 275 बालकांचे लसीकरण

vaccination
vaccinationesakal
Updated on

नाशिक : महापालिकेकडून गुरुवार (ता. १५) पासून शहरात गोवर रूबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. २८ दिवसांच्या या मोहिमेत पहिल्या दिवशी २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. (Measles Rubella Vaccination 275 children vaccinated on first day by nmc Nashik News)

गोवरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शासनाच्या सूचनेनुसार गोवर रूबेला लसीकरण मोहिमेला सुरवात झाली. बारा ठिकाणी विशेष वंचित लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. एकूण २७५ बालकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये आरोग्य सेविकांच्या माध्यमातून १३६ बालकांना ‘एमआर १’, तर १३९ बालकांना ‘एमआर २’ चा डोस देण्यात आला.

महापालिकेच्या माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांच्या पथकाने पंचवटी विभागातील औरंगाबाद नाका परिसरात भेट देऊन स्थलांतरित नागरिकांच्या बालकांना डोस दिले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात १५ ते २५ डिसेंबर व दुसऱ्या टप्प्यात १५ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीत गोवर रूबेला लसीकरण केले जाणार आहे. शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नऊ महिने ते पाच वर्षे वयाच्या बालकांना गोवर रूबेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांची यादी तयार करण्यात आली आहे. लसीकरणाच्या डोसमधील अंतर २८ दिवसांचे राहणार आहेत. पालकांनी गोवर रूबेला लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, तसेच सर्वेक्षणाला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

vaccination
Nashik ZP News : अनुकंपावरील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी; 118 उमेदवार प्रतीक्षेत

समुपदेशनानंतर मोहीम सुरळीत

पंचवटी विभागातील औरंगाबाद नाका परिसरात स्थलांतरित नागरिक राहत असल्याची माहिती महापालिकेच्या पथकाला मिळाली. मात्र, येथील नागरिक बालकांना डोस देण्यास तयार नव्हते. समुपदेशनाच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आल्यानंतर १७ वंचित बालकांना गोवरचा पहिला डोस देण्यात आला.

माता- बाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, युनिसेफ सल्लागार डॉ. सुमेध कुदळे, युनिसेफ क्षेत्र समन्वयक नलिनी चासकर, तपोवन यूपीएचएससी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका पाटील, सुनीता गांगुर्डे, मनीषा खोलासे, आशासेविका चित्रा पवार यांनी या भागात मोहीम पार पाडली.

vaccination
Clapping Therapy : टाळ्या वाजवा अन्‌ प्रतिकारशक्ती वाढवा!; आरोग्‍याला होतोय फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.