Nashik: देशात वैद्यकीय प्रवेश सुरू, राज्‍यात कधी? NEET होऊनही प्रवेशाची चिन्हे नसल्याने विद्यार्थी हवालदिल

Medical Admission
Medical Admissionesakal
Updated on

SAKAL Exclusive : वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षासाठी घेतलेल्‍या ‘नीट २०२३’ परीक्षेचा निकाल जाहीर होऊन महिला उलटला असून, अद्याप प्रवेशप्रक्रियेला सुरवात झालेली नाही.

देशातील इतर राज्‍यांमध्ये प्रवेशप्रक्रियेने गती धरली असताना प्रगत महाराष्ट्रात विलंब होण्याचे कारण काय, असा प्रश्‍न पालक, विद्यार्थ्यांकडून उपस्‍थित केला जातो आहे. (Medical admissions start in country not state Students frustrated because no sign of admission despite passing NEET Nashik)

नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षा घेण्यात आली होती. गेल्‍या ७ मेस देशभरातील व परदेशातील परीक्षा केंद्रांवरही ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने पार पडली होती.

इंग्रजी, मराठी व हिंदीसह एकूण १३ भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल व विद्यार्थ्यांची राष्ट्रीय क्रमवारी १३ जूनला जाहीर केली होती.

निकाल जाहीर होऊन महिन्‍यापेक्षा जास्‍त कालावधी उलटून गेलेला असताना, अद्यापपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली नाही. यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढलेली आहे.

गतवर्षीची पुनरावृत्ती नको...

गेल्या वर्षी अशाच प्रकारे विलंबाने प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली होती. कोरोना महामारीमुळे बहुतांश सर्वच अभ्यासक्रमांना गेल्‍या शैक्षणिक वर्षात विलंब झालेला होता.

वैद्यकीयचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांवर आधारित असल्‍याने कमी वेळेत शिक्षणक्रम पूर्ण करणे आव्‍हानात्‍मक ठरत आहे.

अशात या वर्षी अन्‍य सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे वेळापत्रक पूर्वपदावर आले. असे असताना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रियेला खीळ बसल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून मनःस्‍ताप व्‍यक्‍त केला जातो आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Medical Admission
Nashik News : चिखल तुडवतच मार्गक्रमण; मखमलाबाद परिसरातील नववसाहतीत रहिवासी समस्यांनी त्रस्त

अन्‍य राज्‍ये आघाडीवर

देशातील इतर राज्‍यांमध्ये प्रवेशप्रक्रियेने गती घेतली असून, अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रिया पूर्णत्‍वाकडेही आलेली आहे. गुजरातमध्ये अर्जासाठी २४ जुलै, कर्नाटकात २१ जुलै, पंजाबात २१ जुलै, अरुणाचल प्रदेशात १८ जुलै आणि तमिळनाडूत अर्जाची मुदत १० जुलै अशी ठेवण्यात आली होती.

यापैकी काही राज्‍यांमध्ये प्रवेश फेऱ्यांपर्यंत प्रक्रिया पुढे पोहोचली आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्या वैद्यकीय शाखेतील एमबीबीएस, बीडीएस यांसह आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरेपी यासह अन्‍य अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया रखडलेल्‍या आहेत.

बी.एस्सी. (नर्सिंग)ला गती

गेल्‍या वर्षीपर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमांबरोबर बी.एस्सी. (नर्सिंग) अभ्यासक्रमाचे प्रवेशही नीट परीक्षेच्‍या आधारे दिले जात होते. परंतु, यंदा राज्‍यात प्रथमच नर्सिंगसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती.

या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन सध्या अर्ज प्रक्रिया राबविली जाते आहे. १० हजार ७०९ विद्यार्थ्यांना नोंदणी करून प्रवेशप्रक्रियेत सहभागही नोंदविला आहे. लवकरच प्रवेश फेऱ्यांची प्रक्रिया सुरू होईल.

Medical Admission
SSC Re Exam 2023 : दहावीची पुनर्परीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()