नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिलेला कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणीचा आदेश बासनात गुंडाळला गेल्याने निश्वास सोडलेल्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (Medical certificates will be verified ZP Employees panicked orders of CEO nashik News)
जिल्हा शासकीय रुग्णालयातून आंतरजिल्हा बदलीसाठी काही पोलिस अंमलदारांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविल्याचे आढळून आल्यानंतर पोलिस दलासह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयातील संशयित कर्मचारी व पोलिसांना अटकही झालेली आहे. या प्रकरणात नाशिक जिल्हा रुग्णालय, धुळे येथील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त शल्यचिकित्सकांचे नाव समोर आल्याने सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय झाला होता.
याच अनुषगांने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश यंत्रणेला सप्टेंबर महिन्यात दिले होते. मात्र, बनसोड यांची बदली झाल्याने ही पडताळणी बासनात गुंडाळण्यात आली होती. जिल्हा परिषदेतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयामार्फतच प्रमाणपत्र मिळविलेले आहेत. यात अनेक बोगस प्रमाणपत्र कनेक्शन उघड होण्याची शक्यता असल्यानेच ही पडताळणी टाळली जात असल्याचे बोलले जात होते. मात्र, मित्तल यांनी दखल घेत ज्या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केलेले आहे त्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.
बोगस प्रमाणपत्रधारक येणार समोर
जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांच्या दरम्यान कर्मचारीवर्गाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून दिव्यांग दाखविले जाण्याचे प्रकार होतात. यात सोईच्या बदल्या करून घेतात. त्यामुळे सर्वांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची पुन्हा पडताळणी करून घेण्याचे आदेश मिळाले आहेत. या आदेशामुळे बोगस प्रमाणपत्र दाखल करून लाभ घेतलेले कर्मचारी समोर येणार आहेत. आरोग्य विभागांतर्गत गत वर्षात २५ हून अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेतच, सोईच्या बदल्या करून घेतलेल्या असल्याचे वृत्त आहे. याशिवाय अनेक विभागातही अशा कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.
"मुख्य कार्यकारी अधिकारींनी वैद्यकीय प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रियेसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले आहे त्यांची पडताळणी केली जाईल. तसे विभागप्रमुखांना कळविले आहे."
-आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.