Nashik ZP Selfie Attendance : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू करण्यात आलेल्या सेल्फी हजेरीला आरोग्य कर्मचाऱ्यापाठोपाठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील आक्षेप नोंदविले आहेत.
सेल्फी हजेरीतील उणिवा दाखवत यातील अडचणींचा पाढाच राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. ४) जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासमोर वाचला.
यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याची आग्रही मागणी संघटनेने या वेळी केली. (Medical officers also object to selfie attendance nashik zp)
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
बायोमेट्रिक हजेरी मशिन असताना कर्मचारी हजर नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर आता थेट सेल्फीद्वारे हजेरी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. यात हजेरीसह फोटो अपडेशन, लाइव्ह लोकेशन आणि जिओ टॅगिंग यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.
जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेल्फीद्वारे हजेरी १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. या सेल्फी हजेरीला आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला.
कर्मचारी वर्गाचा विरोध असतानाच वैद्यकीय अधिकारी यांनाही या सेल्फी हजेरीतील उणिवांवर बोट ठेवत विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या दालनात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत प्रलंबित मागण्या मांडल्या.
यात प्रामुख्याने आस्थापनाविषयी असलेले विविध प्रश्न मांडण्यात आले. त्यानंतर सेल्फी हजेरीचा मुद्दा उपस्थितीत झाला. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी २४ तास सेवा देतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे त्यांची हजेरी कशी धरली जाणार, हजेरीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र निश्चित केलेले आहे. मात्र, त्याअतंर्गत असलेल्या उपकेंद्रात अनेकदा अधिकारी यांना काम करावे लागते. उपकेंद्रातील क्षेत्र हजेरीसाठी घेण्यात आलेले नाही.
त्यामुळे हजेरीसाठी अडचण येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. दुर्गम व अतिदुर्गम भागात मोबाईल रेंज तसेच काही मोबाईलवर ही सुविधा नसल्याने हजेरी कशी घेतली जाणार, असे प्रश्न उपस्थित करत कामांचे तास निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली.
सेल्फी हजेरीला विरोध नाही. परंतु यात मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी असल्याचे निर्दशनास आणून देत त्या दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीतील मागण्या
बैठकीत आरोग्य केंद्रात सफाई कर्मचारी, कंत्राटी वाहन चालकांची रिक्त पदे भरण्यात यावी, वैद्यकीय अधिकारी यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे,
आरोग्य केंद्रामध्ये सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आठवड्यात दोनवेळा औषधे दिली जातात ती तीनवेळा देण्यात यावी, यासाठी लागणार खर्च विभागाने करावा, अशा मागण्या मांडण्यात आल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.