सिडको : अश्विनी गरमधील (स्व.) मीनाताई ठाकरे उद्यानाची दुरवस्था झाली असून, खेळणी तुटल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. उद्यानात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य असून, प्रेमीयुगुलांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. तुटलेल्या खेळण्याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिकेत तक्रार करून देखीलही दुरुस्ती झाली नाही.
नवीन खेळणीदेखील बसवण्यात येत नसल्याने नागरिकांचा उद्यानात येण्यास हिरमोड होत असल्याचे दिसून येत आहे. उद्यानात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येत आहे. साफसफाई केलेला कचरा एका ठिकाणी गोळा करून ठेवलेला असताना घंटागाडी कर्मचारी घेऊन जात नसल्याने दिसून येत आहे.(Meenatai Thackeray Park in Garbage problem Urgent measures demanded Ignored despite repeated complaints by municipal corporation Nashik News)
उद्यान परिसरात दुपारी प्रेमीयुगुलांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिकांना याचा मनस्ताप होत आहे. प्रेमीयुगुलांना कोणी काही बोलण्यास गेले असता थेट अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करण्याचे प्रकार होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.
उद्यानाच्या प्रवेशद्वाराला असलेली विद्युत वाहिनीच्या डीपीस सुरक्षा कुंपण बांधण्यात आले होते, मात्र या सुरक्षा कुंपणाची जाळी तुटली आहे. एखादा अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्वरित दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.
मीनाताई ठाकरे उद्यान
* खेळणी तुटलेल्या अवस्थेत
* वारंवार तक्रार करूनही खेळणी दुरुस्ती नाही.
* उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य
* घंटागाडी वेळेवर येत नाही
* प्रेमीयुगुलांचा वावर
* विद्युत डीपीस सुरक्षा कुंपण टाकण्याची मागणी
"उद्यानाच्या बाजूलाच आमचे घर आहे. उद्यानातील खेळणी दुरुस्ती किंवा नव्याने टाकण्यासाठी महापालिका प्रशासन काहीही उपाययोजना करत नाही. उद्यानात दुपारी प्रेमीयुगुलांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो."
- किरण गामणे- दराडे, माजी नगरसेविका
"उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठी आणत असतो. उद्यानात स्वच्छता बऱ्यापैकी असली तरी उद्यानात मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असतो. हा कचरा उचलून नेण्याची तसदी घंटागाडी कर्मचारी घेत नसल्याने दुर्गंधी पसरते."
- सोनम जयस्वाल, गृहिणी
"उद्यानाच्या प्रवेशद्वारावर विद्युत वाहिनी करणारी एक मोठी डीपी असून या डीपीचे सुरक्षा कुंपण गेल्या अनेक वर्षांपासून तुटले असून, येथे उपाययोजना करण्यात यावी. एखादा भीषण प्रकार घडल्यानंतरच प्रशासनास जाग येते का?"
- अस्मिता पाटील, गृहिणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.