नाशिक : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान (Legislative Council Elections), महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Adghadi government) सुरुंग लागल्याने ‘कहीं खुशी तो कहीं गम’च्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेनेच्या (Shiv sena) राज्यातील खासदार, आमदारांना तातडीने मुंबईत बोलाविण्यात आले आहे तर, कॉंग्रेसच्या (Congress) आमदारांनाही दिल्लीत बोलाविण्यात आली असून, त्यांची उद्या (ता.२२)सकाळी बैठक होणार आहे. दरम्यान, मविआ सरकारच्या अस्थिरतेमुळे भाजपच्या गोटात मात्र आनंदाचे वातावरण असून, राज्यात लवकरच भाजपचे (BJP) सरकार येईल अशी आशा व्यक्त केली आहे. (meeting of shiv sena Congress MLAs soon government of bjp formed nashik politics news)
त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या सदगुरू परमपूज्य मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या शिलापूजन सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, कॉंग्रेसचे त्र्यंबकेश्वर-इगतपुरी विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर तर, नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार सीमा हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी या लोकप्रतिनिधींनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्यातील बदलत्या राजकारणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
"प्रसारमाध्यमांवर जी काही चर्चा सुरू आहे, तीच आमच्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र, आज सायंकाळी सात वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील खासदार, आमदारांची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. त्यावेळी काय ते स्पष्ट होईल. मात्र मविआ सरकारला कोणताही धोका नाही." - खासदार हेमंत गोडसे.
"रात्रीतून ज्या काही घडामोडी झाल्या त्या मला सकाळी समजल्या. राज्यातील कॉंग्रेसच्या आमदारांना उद्या दिल्लीत बोलाविले आहे. दिल्लीत सकाळी अकरा वाजता बैठक आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचे समजते. परंतु त्यामुळे सरकार अस्थिर होईल असे वाटत नाही."
- आमदार हिरामण खोसकर.
"महाविकास आघाडी सरकारचा बुरुज ढासळला आहे. या सरकारचा पत्त्याचा बंगला देवेंद्र फडणवीस यांनी पाडला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेत येईल असा विश्वास आहे." - आमदार सीमा हिरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.