इगतपुरी : सकल मराठा समाजातर्फे शेणित फाटा (ता. इगतपुरी) येथे १०१ एकर क्षेत्रावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या बुधवारी (ता. २२) होणाऱ्या जाहीर सभेचे नियोजन पूर्ण झाले आहे.
इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यातून सभेसाठी येण्याचे नियोजन सुरू आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव या सभेसाठी येणार असून, येण्याच्या मार्गांवर विविध प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यात येतील. (Meeting on Wednesday at 101 Acres in Shenit Phata manoj jarange patil Meeting preparations nearing completion nashik)
शेणित येथील नियोजित सभास्थळावरून मनोज जरांगे-पाटील यांचे छायाचित्र असलेला बलून रविवारी (ता. १९) सोडण्यात आला. सभेच्या दृष्टीने आर्किटेक्ट प्लॅन करण्यात आला असून, नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडणार आहे.
जवळपास ३०० फुटी रॅम्प आणि १० फूट उंच स्टेज तयार करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची १० बाय १० फूट व ११ फूट उंच मूर्ती आणि जरांगे-पाटील हे स्टेजवर राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.
महिला विभाग, स्वच्छतागृह व्यवस्था, आरोग्य विभाग, पाणी, नाश्ता व स्टॅाल याबाबतचे सर्व नकाशे तयार असून, त्यानुसार कामे पूर्णत्वाकडे आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.