Nashik Political : उद्धव ठाकरे सेनेच्या दुसऱ्या फळीवर शिंदे गटाची नजर!

CM Eknath Shinde & Uddhav Thackeray
CM Eknath Shinde & Uddhav Thackerayesakal
Updated on

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला महाराष्ट्रात शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने जोरदार तयारी केली असून, नाशिकमध्ये ठाकरे सेनेच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात खेचण्याची रणनीती आखली जात आहे. ठाकरे सेनेतील दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांमधील अस्वस्थता टिपून भगदाड पाडण्याचे नियोजन आहे. (Meeting with Chief Minister Eknath Shinde on Sunday Nashik Political News)

जून महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपच्या मदतीने सरकार स्थापन झाले. तब्बल ४० आमदार फुटल्याने शिवसेनेसाठी मोठा झटका बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आमदार फुटताना संघटना व संघटनेच्या चिन्हावरदेखील दावा केला. सध्या हा वाद न्यायप्रविष्ट आहे. परंतु, एकीकडे न्यायालयीन लढाई लढत असताना दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला भगदाड पाडण्याचे नियोजन शिंदे गटाकडून केले जात आहे.

यामध्ये शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता टिपली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या दुसऱ्या फळीमध्ये अस्वस्थता आहे. संघटनेत पहिल्या क्रमांकावर येताना पहिल्या फळीतील पदाधिकाऱ्यांची अडचण आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून काम करूनही चांगली संधी मिळत नसल्याची भावना तयार झाली. अस्वस्थतेची ही भावना फिरून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे गटाने दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना गटात खेचण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

CM Eknath Shinde & Uddhav Thackeray
Nashik : बाजार समितीत हवाय उच्च दर्जाचा ‘तिसरा डोळा’!

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी असून, शिंदे गटाचे भाजपसोबत युती झाल्यास वेळेवर उमेदवारांची शोधाशोध करण्याची आवश्यकता भासणार नाही असा कयास यामागे आहे.

मुंबई मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने लोकसभा निवडणुकीची तयारी करताना महापालिका निवडणुकीसाठीदेखील तयार राहण्याच्या सूचना शिवसैनिकांना केल्या आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी (ता.६) मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे प्रवेशदेखील केले जाणार असल्याचे समजते.

CM Eknath Shinde & Uddhav Thackeray
Nashik Crime News : शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.