तिसऱ्या लाटेसाठी नाशिक मनपा आरोग्य विभागात मेगा भरती

nashik municipal corporation
nashik municipal corporationesakal
Updated on

नाशिक : कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागामार्फत ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २३६ विविध पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ५० स्टाफ नर्स या पदासाठी जवळपास एक हजार पेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज केले. (Mega recruitment in Nashik Municipal Health Department)

केंद्र व राज्य सरकारने तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने महापालिकेने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कोविड सेंटर, ऑक्सिजन बेड वाढविताना मनुष्यबळाची देखील गरज भासणार आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागात डॉक्टर, तंत्रज्ञ, नर्स, वॉर्डबॉय यांची मानधनावर भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. ४० वैद्यकीय अधिकारी, २८ एमडी डॉक्टर्स, स्टाफ नर्स ५०, एएनएम २००, तंत्रज्ञ १० अशी पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी थेट मुलाखती घेतल्या जात आहेत. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुलाखतीसाठी पॅनल नियुक्त करण्यात आले आहे. स्टाफ नर्सच्या ५० पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी बाराशे उमेदवारांनी हजेरी लावली.

nashik municipal corporation
नाशिकचा युवा सायकलपटू ओमची विश्वविक्रमाला गवसणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.