मनमाड : चेन्नई येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत मनमाडच्या मेघा आहेरने आपल्या बहिण-भावाचा वारसा कायम राखत सुवर्ण कामगिरी केली.
मेघाच्या कुटुंबातील हे तिसरे खेलो इंडिया स्पर्धेतील पदक असून यापूर्वी वीणा व मुकुंद आहेर यांनी खेलो इंडियाचे पदक पटकावले होते. एकाच घरात तीन खेलो इंडिया स्पर्धेचे पदक असणारे ते महाराष्ट्रातील ते पहिले कुटुंब बनले आहे. (Megha Gold in Khelo India weightlifting competition 3 Gold medals in aher family at manmad nashik news)
मांडवड (ता. नांदगाव) येथील शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मेघा आहेर हिने वेटलिफ्टिंग मधील ४५ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. हे स्वप्न साकार करताना तिने क्लीन व जर्कमध्ये स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली.
विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाली आहे. मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याने कांस्यपदक पटकाविले. मेघा हिने या स्पर्धेतील स्नॅच या प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात ६३ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्क या प्रकारात ८५ किलो वजन असे एकूण १४८ किलो वजन उचलले.
क्लीन व जर्क या प्रकारात तिने दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी महाराष्ट्राच्याच सौम्या दळवी हिने गत वेळी नोंदविलेला ८३ किलो या विक्रमाची बरोबरी केली. पाठोपाठ आंध्र प्रदेशच्या आर. भवानी हिने ८४ किलो वजन उचलून नवा उच्चांक नोंदविला.
तथापि मेघाने शेवटच्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला. मेघा हिची मोठी बहीण वीणा व भाऊ मुकुंद हे दोघेही आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आहेत. भावंडाकडून प्रेरणा घेत मेघाने वेटलिफ्टिंग मध्ये करिअर सुरू केले आहे.
मेघा ही मनमाड येथील छत्रे महाविद्यालयात इयत्ता अकरावी शास्त्र शाखेत शिकत आहे. ती जय भवानी व्यायाम शाळा येथे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
कृष्णा व्यवहारेस कांस्यपदक
मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने स्नॅच या प्रकारात ८३ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्कमध्ये त्याने १०१ किलो असे एकूण १८४ किलो वजन उचलले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.