लग्नाच्या 2 दिवस आधी रंगताय मेहंदी समारंभ; लग्न खर्चात होतेय वाढ

Mehendi Ceremony
Mehendi Ceremonyesakal
Updated on

विराणे (जि. नाशिक) : सध्या लग्नसराई जोरात आहे. लग्न (Wedding) म्हटले म्हणजे एक- दीड महिना तयारीसाठी लागतोच. वधू व वर कुठेही नाराज राहणार नाहीत, याची काळजी कुटूंबातील सर्वच व्यक्ती घेत असतात. पूर्वी लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळी मांडव व सायंकाळी हळदी समारंभ (Haladi Ceremony) होत असत. तर दुसऱ्या दिवशी लग्न. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून लग्नाच्या दोन दिवस अगोदर सायंकाळी वधू व वर यांचा मेहंदी समारंभ रंगू लागल्याने लग्न समारंभ तीन दिवस चालू लागले आहेत.

मेहंदी समारंभासाठी आकर्षक मंडप उभारला जातो. तसेच, घर परिसर रंगीबेरंगी रोषणाईच्या माळांनी सजवला जातो. वराच्या हातांवर तर वधूच्या हात, पायांवर मेहंदी काढली जाते. वधू- वरांसोबतच नातलगांच्या हातांवर देखील मेहंदी काढली जाते. मेहंदी काढण्यासाठी व्यावसायिक काम करणारे पैसे देऊन बोलवले जातात. पूर्वी जवळच्या नात्यातीलच व्यक्ती मेहंदी काढत असे. वधू- वरांचे औक्षण देखील केले जाते. वधू आणि वरांचे मेहंदी समारंभ एकत्र न करता स्वतःच्याच घरी केले जातात. मेहंदी काढल्यानंतर बालगोपाल नृत्य देखील सादर करतात. त्यासाठी ते पूर्वतयारी देखील करतात. महिला व पुरूष देखील गाण्यांवर ठेका धरतात. कुठे स्पीकर लावून तर कुठे बॅंड, डीजे लावत नृत्य सादर केली जातात. आलेल्या नातलग, मित्र परिवाराच्या जेवणावळी रंगतात. सदर कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालूच असतो.

वधू- वरांच्या हौसेपोटी ईच्छा नसतांना देखील मेहंदी समारंभ कुटूबियांना करावा लागतो. यामुळे लग्नखर्चात वाढ होत असते. पूर्वी नातलगांना दोन दिवस लग्नासाठी द्यावे लागत होते. परंतु, मेहंदी समारंभामुळे आता तीन दिवस जवळच्या नातलगांना लग्नघरी जावे लागते. मेहंदी समारंभ (Mehendi Ceremony) करणे हा सध्या प्रतिष्ठेचा विषय समाजात ठरत आहे.

Mehendi Ceremony
रमजान व कडक उन्हामुळे टरबुज उत्पादक खुश; दररोज तीनशे टन विक्री

"दिवसागणिक लग्नसमारंभात नवनवीन फंडे येत आहेत. यामुळे लग्नखर्चात प्रचंड वाढ होऊन वधू- वर पक्ष कर्जबाजारी देखील होतात. तरूण, तरूणींनी आई, वडीलांचा विचार करत समजदारीची भूमिका घेऊन खोट्या प्रतिष्ठेला फाटा देऊन साध्या पद्धतीने लग्न करावीत."

- मधू पाटील, मालेगाव

"मंगल कार्यालय, सोने, कपडे, जेवणावळी, बँड, वाहने, रोषणाई साठी मोठ्या प्रमाणावर लगनकार्यात खर्च होतो. त्यात मेहंदी समारंभाच्या अनावश्यक खर्चाची भर पडल्याने खर्च वाढला. साध्या पद्धतीने विवाह सोहळा होणे काळाची गरज आहे."

- मनीषा भुसे, शिक्षिका, वडेल

Mehendi Ceremony
राज्यातील 198 शेतकऱ्यांचा कृषी पुरस्काराने होणार सन्मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.