मेहुल चोक्सीची नाशकातील मालमत्ता IT कडून जप्त

आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत 9 एकर 22 गुठ्ठ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Mehul Choksis video message ED allegations False and Baseless
Mehul Choksis video message ED allegations False and Baseless
Updated on

नाशिक : बँकांची मोठ्या प्रमाणात (Bank Fraud) फसवणूक करून पोबारा करणाऱ्या मेहूल चोक्सीची बेनामी संपत्ती नाशिकच्या (Nashik) इगतपूरी येथे सापडली आहे. मुंढेगावच्या बळवंतवाडीतील मालमत्ता (Property) जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने (IT) केलेल्या या कारवाईत 9 एकर 22 गुठ्ठ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. घोटाळ्याच्या पैशातून ही मालमत्ता घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल चोक्सी हा हजारो कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून, त्याला पकडण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसह जारी करण्यात आली आहे. (Mehu Choksy News)

Mehul Choksis video message ED allegations False and Baseless
नासाने शेअर केलेला मंगळ ग्रहाचा फोटो पाहिलात का?

जप्त करण्यात आलेली ही मालमत्ता नाशिक मुंबईमार्गे जाणारा उत्तर भारताकडे जो रेल्वे मार्ग आहे त्याच्या अगदी समोरच्या बाजूला असलेल्या मुंबई-नाशिक, मुंबई-आग्रा जो महामार्ग आहे या दोन्हीमध्ये लागून असलेल्या ठिकाणी चोक्सीची ही जागा असून, बळवंतवाडीच्या शिवारात ही संपूर्ण जागा आहे. सुमारे 14 ते 15 वर्षापूर्वी ही जागा विकत घेण्यात आल्याचे समजत आहे. त्याशिवाय काही स्थानिकांच्या नावाने ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती अशीदेखील माहिती समोर येत आहे. (Mehul Choksy Property In Nashik)

Mehul Choksis video message ED allegations False and Baseless
''दानवेंनी आरोप करण्यापेक्षा आम्हाला सरकार्य करावे''

एसईझेडच्या नावाखाली येथे कंपनी येणार आहे असे सांगून येथील स्थानिक शेतकऱ्यांकडून ही जमीन खरेदी करण्यात आली होती. साधारण 14 ते 15 वर्षांपूर्वी या ठिकाणी मुंबईची काही लोकं येथे आली होती आणि त्यांनी या ठिकाणचा नकाशा नेते होता तसेच येथे कंपनी येणार असल्याचे सांगितले होते, अशी माहिती येथील एका शेतकऱ्याने सामटिव्हीशी बोलताना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.