Eknath Shinde : सोशल मीडियावर राजकीय घडामोडींची ‘खिल्ली’

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचे पडसाद आता ग्रामीण भागातील सोशल मीडियावर उमटू लागले आहे.
Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on

अभोणा (जि. नाशिक) : राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्याने जो राजकीय ‘भूकंप’झाला; त्याचे पडसाद ग्रामीण भागातील सोशल मीडियाच्या सर्व माध्यमातून उमटले.

पंतप्रधानांचा ‘देहू’येथील दौरा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांचा त्र्यंबकेश्‍वर येथील रद्द झालेला दौरा, राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा एकहाती विजय, एकनाथ खडसे यांचा विजय व आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाची चर्चा, या सर्व पार्श्‍वभूमीवर या राजकीय भूकंपाची सोशल मीडियावर सर्वत्र ‘खिल्ली’ उडविण्यात आली. यात ‘पंतप्रधान देहूत आलेत, अन् एकनाथ घेऊन गेलेत’, राज्यपाल माननीय भगतसिंग कोश्यारी यांचे फोटो व्हायरल करून ‘लवकर झोपा अन् पहाटेचा गजर लावा, पहाटे कुणीही येऊ शकतं’ असे संदेश फिरत होते. तसेच, एकनाथ खडसे यांच्या विजयाबद्दल ‘एक नाथ आला अन्‌ एक नाथ पस्तीस घेऊन गेला’, तसेच ‘मी पंक्तीत आलो अन् बुंदी संपली’ असे मिश्किल संदेश दिवसभर झळकले.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुखपदी बसू शकतात का? सेनेच्या घटनेत काय सांगितलंय?

त्याचबरोबर राजकीय बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर ‘धर्मवीर’ चित्रपटातील संवाद व जुन्या काळातील विविध फोटो एडिट करून नवीन चेहरे लावून सर्वत्र व्हायरल झाले. आमदार बच्चू कडू यांचे सरकार बदलाबाबतचे ऑडिओ, उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे फोटो व मिश्किल संदेश. ‘हनुमान चालीसा न वाचू देणाऱ्या सरकारला गरुड पुराण वाचण्याची वेळ’ असे संदेशही फिरत होते. नवनीत राणा, कंगना राणावत यांचे शेरो- शायरीचे फोटोही दिसत होते. काहींनी हे मिश्किल संदेश आपल्या स्टेटसवर ठेवले.

Eknath Shinde
Jalgaon : आमदार ‘नाथां’सोबत अन् कार्यकर्ते अनाथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.