नाशिक : कत्तलीसाठी जनावरांची निर्दयीपणे वाहतूक; एक फरार तर 1 गजाआड

Cattle transport
Cattle transportesakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर येथून संगमनेरच्या दिशेने कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारी पिक- अप आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास वावी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केली आहे. या जीपमधून नऊ कालवडी व एक गोऱ्हा अशी एकुण दहा जनावरे होती. निर्दयीपणे तोंड व पाय बांधून या जनावरांची वाहतूक करण्यात येत होती.

चालकाने वाहन सोडून काढला पळ

पिक- अप जीप क्रमांक (MH- 15- CK- 94) मधून जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार या कार्यकर्त्यांनी सिन्नर-शिर्डी महामार्गावर सापळा रचला होता. सदर वाहन वावी येथे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जीपच्या मागे बांधलेला पडदा सोडण्यास सांगितल्यावर चालकाने वाहन सोडून पळ काढला. तर इम्रान सैय्यद (30 रा. संगमनेर) हा गाडीतच बसून असल्याने या कार्यकर्त्यांच्या हाती सापडला. सदर वाहन वावी पोलिस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले. तेथे पडदा सोडून फाळके उघडल्यावर एकावर एक बांधून टाकलेल्या अवस्थेत दहा जनावरे आढळून आली. त्यांना वाहनातून खाली उतरवून घेऊन स्थानिक पशुवैद्यकाकडून प्रथम उपचार करण्यात आले. ही सर्व जनावरे डांगी जातीचे असून चोरी करून ती कत्तलीसाठी संगमनेर भागातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचा संशय आहे.

Cattle transport
नाशिक महानगरपालिका निवडणूक | भाजप शहरात लढणार स्वबळावर
Cattle transport
नाशिक : कोरोनाने निराधार झालेली ५६ बालके घेतली दत्तक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()