Nashik Winter Update : निफाडचा पारा घसरला; 6.5 अंश सेल्सिअस

अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठला होता. या वर्षातील ही सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली
Winter Update
Winter Updateesakal
Updated on

निफाड : तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात सोमवारी (ता. १५) ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अवघा निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठला होता. या वर्षातील ही सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. (Mercury falls in Niphad below 7 degrees Celsius Nashik Winter Update)

निफाड तालुक्यात २५ डिसेंबरला ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर २१ दिवसांनी सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. सर्वांत कमी तापमानाची नोंद झाल्याने निफाड तालुक्यात थंडीने सगळ्यांना गारठले होते.

थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक, शेतकरी, ऊसतोड कामगारांनी शेकोट्या पेटविल्या होत्या. थंडीमुळे रस्त्यांवर सकाळी वर्दळ कमी होती. कांदा, गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी फायद्याची ठरणार आहे.

Winter Update
Winter Fashion Tips : हिवाळ्यात स्टायलिश दिसायचंय? मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये या प्रकारच्या शालचा करा समावेश

ही थंडी वाढत गेल्यास द्राक्ष मण्यांची फुगवण थांबणार आहे. थंडीमुळे द्राक्षवेलीमधील अंतर्गत पेशींची अन्नग्रहण प्रक्रिया मंदावल्यामुळे द्राक्षघड विकासावर परिणाम होणार आहे. पाणी उतरलेल्या द्राक्ष घडांची मणी तडकून त्याला चिरा जाण्याचे धोके वाढणार आहेत.

"पहाटे पाचपासून सूर्यकिरणे पडेपावेतो द्राक्षबागेला ठिबक सिंचनद्वारे किंवा संपूर्ण द्राक्षबागेत विस्ताराने पाणी द्यावे. त्यामुळे द्राक्षवेलींच्या पेशी सतत कार्यरत राहतील. द्राक्षबागेत ऊब निर्माण होण्यासाठी शेकोटी पेटवून धुर केला पाहिजे, हा बचावात्मक उपाय आहे."

-ॲड. रामनाथ शिंदे, संचालक, राज्य द्राक्ष बागायतदार संघ

Winter Update
Winter Skin Care : हिवाळ्यात चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो? मग मिल्क पावडरचा असा करा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.