Nashik : म्हाळदे घरकुल योजनेचे वाजले बारा

mahasabha at malegaon
mahasabha at malegaonesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या म्हाळदे घरकुल योजनेचे ( Mhalade Gharkul Yojana) बारा वाजले आहे. ही योजना अपयशी होण्यासाठी प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवत नगरसेवकांनी मनपा (municipal corporation) प्रशासनाला धारेवर धरले. ११ हजार घरकुले बांधून तयार असताना अवघी १९०० घरे वितरीत झाल्याने ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेत (Pradhan Mantri Awas Yojana) हस्तांतरीत करण्याचा ठराव महासभेत मंजूर झाला. स्वच्छता, नाले सफाई, जंतुनाशक फवारणी, वॉटरग्रेस ठेका व आरोग्य विभागासाठी भरती या प्रश्‍नांवरुन सत्तारुढ व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा (promotion) ठराव मंजूर करण्यात आला. (Mhalade Gharkul Yojana transferred to pradhan mantri awas yojana in malgaon mahasabha Nashik News)

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चारला राष्ट्रगीताने महासभेला सुरवात झाली. उपमहापौर निलेश आहेर, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव श्याम बुरकुल सभास्थानी होते. सभेत जम्मू काश्‍मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांसह शहरातील मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा शोकप्रस्ताव मंजूर झाला. या ठरावानंतर म्हाळदे घरकूल योजना हस्तांतरीत करण्याचा विषय चर्चेला येताच नगरसेवकांनी प्रश्‍नांची सरबत्ती सुरु केली. रशीद शेख, सखाराम घोडके, डॉ. खालीद परवेज, सुनील गायकवाड आदींनी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे योजनेचे तीनतेरा झाले. अतिक्रमणही हटू शकले नाही, असा आरोप केला.

शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी योजनेची सविस्तर माहिती देताना जनतेचा प्रतिसाद न मिळाल्याने योजना असफल झाल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी त्यांचे म्हणणे धुडकावून लावले. तत्पुर्वी सभेला सुरवात होताच शहरातील विकार अंजुम अब्दुल मलिक व मोहम्मद जाहिद अब्दुल गफ्फार या दोन्ही खेळाडूंची शूटिंग व्हालीबॉल या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली. त्यांनी देशाच्या व्हॉलीबॉल संघात स्थान मिळविले. त्याबद्दल त्यांचा सत्कार करावा. त्यांना दहा लाख रुपये द्यावे, असा मुद्दा अमीन फारुक व मुश्‍तकीम डिग्निटी यांनी सभेत मांडला. यासाठी लवकरच विशेष महासभा घेण्याचे आश्‍वासन महापौरांनी दिले.

सुनील गायकवाड यांनी शंभर खाटांच्या मॉड्युलर रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याशी मनपाचा संबंध नाही का? सीएसआर निधीतून रुग्णालयाचे काम झाले असले तरी जागा मनपाची आहे. या रूग्णालयात स्टाफ केव्हा नियुक्त होणार. मनपाची भूमिका काय? लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेत गटनेत्यांची नावे नाहीत. मनपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा अपमान करतात काय. स्टाफ तुम्ही मर्जीनुसार भरणार का? यासह विविध प्रश्‍न उपस्थित केले. विरोधकांनी त्यांच्या सुरात सुर मिसळत सभागृहात निमंत्रण पत्रिका भिरकावल्या. काही सदस्यांनी पत्रिका फाडल्या. पथदीपांच्या प्रश्‍नावरुन सदस्य आक्रमक झाले होते. दोन वर्षात पथदीप लागू शकले नाहीत, अशा संतप्त भावना सदस्यांनी व्यक्त केल्या.

महासेभत आयएचएसडीपी घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेत उपलब्ध करुन देणे. अधिकाऱ्यांना पदोन्नती, मनपातर्फे माध्यमिक शाळा सुरु करणे, जलवाहिनी, रस्ते काम, रमाई घरकुल योजना दुसरा हप्ता वाटप, विकलांग अर्थसहाय्यात वाढ करणे, गौंड समाज स्मशानभुमीस जागा देणे, आण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजना कामे आदी प्रस्ताव मंजूर करण्यात आले. इस्लामपुरा भागातील भूसंपादनासह जमिन भूसंपादनाचे पाच प्रस्ताव तहकूब करण्यात आले. हज ट्रेनिंग सेंटरमध्ये अभ्यासिका वर्ग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विविध चौक, रस्त्यांना नावे, चौक सुशोभिकरण ठराव मंजूर झाले. मेगा एंटर प्राईजेसच्या याचिके संदर्भातील अपिलावर सत्तारुढ व विरोधकांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले. आशा आहिरे यांनी नाले सफाईचा मुद्दा उचलून धरला. यानंतर सर्व सदस्य नालेसफाई, दैनंदिन स्वच्छता, जंतूनाशक फवारणी या प्रश्‍नी प्रशासनावर तुटून पडले. प्रत्येक प्रभागात अतिरिक्त जेसीबी लावून नालेसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

mahasabha at malegaon
साल्हेर भागात कैऱ्या उतरविण्याची शेतकऱ्यांची लगबग

चर्चेत रशीद शेख, सखाराम घोडके, युनूस ईसा, अस्लम अन्सारी, सुनील गायकवाड, खालीद परवेज, मुश्तकीम डिग्निटी, शानेहिंद निहाल अहमद, एजाज बेग, फकीरा शेख, नंदकुमार सावंत, मदन गायकवाड, अमानतुल्ला पिर मोहंमद, गिरीष बोरसे आदींनी सहभाग घेतला.

mahasabha at malegaon
दैव बलवत्तर म्हणून ओतूरचे चौघे बचावले; कारमधील मोरेंनी सांगितली आपबिती

आणखी एक महासभा होणार

महापालिका सदस्यांची मुदत १५ जूनला संपुष्टात येणार आहे. आजची महासभा झाल्यानंतर काही महत्वपुर्ण विषय व निरोपासाठी आणखी एक महासभा होणार आहे. महापौर ताहेरा शेख यांची प्रकृती बिघडली असल्याने उपमहापौर निलेश आहेर यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. आयुक्तांच्या अनुपस्थितीबद्दलही काही सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. युनूस ईसा, विठ्ठल बर्वे तसेच रशीद शेख व साजीद अन्सारी यांच्यात महासभेत शाब्दीक चकमक उडाली. मात्र, प्रकरण हातघाईवर गेले नाही. आगामी आठवड्यात होणारी महासभा अखेरची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.