MHT CET Result 2023 : पीसीएम आणि पीसीबी, अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा झाली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र शाखेसह कृषी शाखेच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे.
दरम्यान, सीईटी (CET) सेलतर्फे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १९ पैकी १७ प्रवेश परीक्षा पार पडल्या असून, त्यापैकी १६ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. (MHT CET exam Result date declared nashik news)
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी राज्यभरातून नऊ लाख ८ हजार ५०३ विद्यार्थी सामोरे गेलेले आहे, तर राहिलेल्या दोन परीक्षा या महिन्यात व जुलैमध्ये घेतली जाणार आहे.
तसेच बी. एस्सी नर्सिंग- सीईटी २०२३ ऑनलाइन सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच सीईटी कक्षामार्फत घेण्यात येत असून, रविवारी (ता. ११) ही परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी ३१ हजार ३८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. राज्यातील ७५ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
प्रथमच मोबाईल ॲपद्वारे माहिती
व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाणार आहे. प्रथमच मोबाईल अॅपमार्फत उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती, सूचना व जागा वाटप आदींबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे मोबाईल अॅपचा विद्यार्थी, पालकांना फायदा होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.१२) जाहीर होणार आहे. दरम्यान, निकाल सोमवारी सकाळी अकराला जाहीर केला जाणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाविषयी..
- केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस (एपीआय) प्रणालीचा करता येईल उपयोग.
- एपीआयद्वारे बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्राची पडताळणी करता येईल.
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लागणारा सातबारा उतारा आदींची करता येणार पडताळणी.
- प्रवेश प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन, शंकांचे निरसन करण्यासाठी प्रादेशिक संवाद कार्यक्रमांचे केले जाईल आयोजन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.