NMC PWD News: मिरची चौकातील डागडुजी निकृष्ट; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही गांभीर्य नसल्याचे स्पष्ट

The predicament of divisors on signals
The predicament of divisors on signalsesakal
Updated on

NMC PWD News : भीषण अपघात घडलेल्या छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची चौकात पुन्हा अपघात होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अपघात होवू नये म्हणून येथे करण्यात आलेल्या उपाययोजना निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देवून तातडीने अपघात होवू नये म्हणून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अवघ्या नऊ महिन्यात कामाची शकले उडाली आहेत. (michi Chowk accident case Repair Poor no seriousness after visit CM Shinde by nmc PWD nashik news)

मिरची सिग्नल येथे असलेला मोठा हॅम्पर.
मिरची सिग्नल येथे असलेला मोठा हॅम्पर.esakal

ऑक्टोबर २०२२ मध्ये पंचवटी विभागातील छत्रपती संभाजी महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात पहाटे मोठा बस अपघात झाला.

अपघातानंतर बसला आग लागून यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त ब्लॅक स्पॉट शोधण्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर महामार्गावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, शहर पोलिस वाहतूक शाखा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नाशिक महापालिकेकडून संयुक्त सर्वेक्षण केले.

दुर्घटना घडलेल्या मिरची चौकात गतिरोधक टाकण्यात आले, प्लॅस्टिक पेंट करण्यात आले, सायनेजिस लावण्यात आले, अतिक्रमण काढलेल्या भागात रस्त्याचे ड्रेसिंग करण्यात आले, दृश्यमानता वाढविण्यात आली, रस्त्याचे व फॅनिंगचे डिमार्केशन, दुभाजक, कॅट आईज सायलेजेस तातडीने बसविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The predicament of divisors on signals
NMC Water Tap Connection: अनधिकृत नळजोडणी नियमितीकरणाला मुदतवाढ

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत महामार्ग असला तरी मुख्यमंत्र्यांनी आदेशित केल्याने तातडीने कार्यवाही करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

सद्यःस्थितीत हे आहेत हाल

मिरची चौकात सिग्नलच्या बाजूला असलेल्या रिंगरोडवर गतिरोधक बसविण्यात आले. परंतु गतिरोधक पार करताना डोंगर पार करण्याचा फिल येतो. गतिरोधकावरील डांबर वितळल्याने चढउतार झाले आहेत.

महामार्गावरील पांढरे पट्टे गायब झाले. रस्त्याचे व फॅनिंगचे डिमार्केशन अद्यापही झाले नाही. दृश्यमानता संपुष्टात आली आहे.

सिग्नल कायम बंद असल्याने वाहतुकीला अडथळा येतो. दरम्यान महापालिकेच्या वतीने काम झाले आहे. सदरचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिक करतं आहेत.

The predicament of divisors on signals
NMC News: वीजपुरवठा खंडित केल्याचा दावा फोल; धोकादायक वाडे, इमारतींना नोटिशीचा सोपस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.