मनमाड : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हायपॉवर कमिटीच्या बैठकीत मनमाड शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘एमआयडीसी’ला मान्यता देण्यात आली असून, आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. (MIDC approves for Manmad decision taken in High Power Committee meeting chaired by Industries Minister uday samant Nashik News psl98)
आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी घातलेले लक्ष आणि मनमाड शहरासह परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मनमाड एमआयडीसीचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे नांदगाव तालुक्यातील तरुणांना रोजगारासाठी इतर ठिकाणी भटकंती करण्याची गरज राहणार नाही. आमदार सुहास कांदे यांनी मनमाड ‘एमआयडीसी’साठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला आहे.
शहरात करंजवण पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजनावेळी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमआयडीसी मंजूर करत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आमदार कांदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
राज्यातील विविध एमआयडीसीचा प्रस्तावाचा हायपॉवर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. त्यानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनमाड शहरासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या मनमाड एमआयडीसीला मान्यता देण्यात आली.
मनमाडकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब असून, एमआयडीसी झाल्यास रोजगाराचा प्रश्न मिटला जाणार आहे. बैठकीत शहराजवळ असलेल्या अनकवाडे शिवारातील खासगी ८९.८७ हे. आर व सरकारी ३.६१ हे. आर तसेच सटाणे शिवारातील खासगी ८३.१३ हे. आर व सरकारी १.२९ हे.आर अशी एकूण १७७.३०
हे. आर क्षेत्रास मऔधव अधधधनयम, १९६१ अन्वये प्रकरण ६ व कलम २ खांड (ग) लागू करणेबाबत आदेश पारित करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून मनमाड शहरातील नागरिक एमआयडीसीच्या प्रतीक्षेत होते.
एमआयडीसी झाल्यास मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार असून, आता शहर सोडून बाहेरगावी नोकरीसाठी जाण्याची गरज राहणार नसल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.