इगतपुरी (जि. नाशिक) : शिक्षणापासून दूर गेलेल्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात मिशन झीरो ड्रॉपआउट सुरू करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत गाव-परिसरात सर्वेक्षण करीत असताना मुंढेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अनिल बागूल व नरेंद्र सोनवणे यांना वीटभट्टीवर सहा शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले.
सुरुवातीला पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नव्हते, त्यावेळेस प्रत्यक्ष भट्टीवर जाऊन शिक्षकांनी अध्यापनाचे वर्ग सुरु केले. मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पालक व विद्यार्थी यांचे समुपदेशन करून त्यांना शाळेत येण्यास प्रोत्साहन दिले. (Migrant children from brick kilns in stream of education under Mission Zero Dropout Nashik news)
या बाबीची दखल घेत गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक भरून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्यात आला. बीट विस्तार अधिकारी राजेंद्र नेरे व मुख्याध्यापक भगवंत पाटील यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, लेखन साहित्य व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.
या स्थलांतरित विद्यार्थ्यांमध्ये रत्ना भिल, दीपाली भिल, बादल भिल, अविनाश भिल, सोमनाथ भिल, सुनील भिल या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थी आडगाव (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील रहिवासी असून ते आपल्या पालकांसोबत वीटभट्टीवर आलेले आहेत.
शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक रेखा शेवाळे, अनिल बागूल, नरेंद्र सोनवणे, सरला बच्छाव, मालती धामणे, विमल कुमावत, ज्योती ठाकरे, सुनंदा कंखर, हेमलता शेळके, भगवान देशमुख, राजकुमार रमणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. स्थलांतरित होऊन आलेल्या मुलांना मोफत शिक्षणासोबत शालेय पोषण आहाराचा देखील लाभ देण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.