Nashik Crime: गावाकडील जमिनीच्या वादातून केला परप्रांतिय विवाहितेचा खून; 24 तासात खुनाची उकल

murder
murderesakal
Updated on

Nashik Crime : मयत परप्रांतिय विवाहितेच्याच नात्यातील संशयिताने गावातील जमिनीच्या वादातून तिचा खून केल्याचे उघड झाले आहे.

सातपूर गावातील विधाते गल्लीत सोमवारी (ता. २६) सकाळी २९ वर्षीय विवाहितेचा गळा चिरून खूनाची घटना घडली होती. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच सदरील कुटूंबिय हे नाशिकमध्ये कामानिमित्ताने राहण्यास आले होते.

दरम्यान, सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अवघ्या २४ तासात खूनाची उकल केली आहे. (Migrant married woman killed due to land dispute near village Solve satpur murder case in 24 hours Nashik Crime)

अशोक्तीबाई शनीदयाल बैगा (२९, रा. आनंद नाठे यांचे घरात भाडेकरू, विधाते गल्ली, सातपुरगाव. मूळ रा. गिंजरी, ता. पाली, जि.उमरिया, बिरसिंगपुर पाली, मध्यप्रदेश) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी सातपूर पोलिसात शनीदयाल रामजियामन बैगा (रा. विधाते गल्ली, सातपुरगांव) यांनी फिर्याद दिली होती.

तर, जयकुमार परसराम बैगा (२६, रा. आनंद नाठे यांचे घरात भाडेकरू, विधाते गल्ली, सातपुरगांव. मूळ रा. गिंजरी, बिरसिंगपुर पाली, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी (ता. २६) सकाळी फिर्यादी शनीदयाल बैगा हे पहाटेच कंपनीत कामावर गेले. तर, त्यांची दोन मुले हे घरातीलच वरच्या खोलीत मोबाईलवर सिनेमा पहात होते.

त्याचवेळी संशयित जयकुमार याने संधी साधून मयत अशोक्तीबाई हिच्याकडे गावाकडील जमिनीबाबतचा विषय काढला. त्यावरून त्यांच्या वाद झाला असता, संशयित जयकुमार याने घरातील चाकूने अशोक्तीबाई यांच्या गळ्यावर वार करून निर्घृण खून केला.

सदरची घटना सकाळी सात ते अकरा वाजेच्या दरम्यान घडली. मुले खाली आल्यानंतर घटनेची वाच्यता झाली.

घटनेची माहिती मिळताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त वसंत मोरे, शेखर देशमुख व सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी या घरात राहणाऱ्या ११ संशयितांना ताब्यात घेतले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

murder
Nagar Crime : सुगंधी तंबाखू विकणाऱ्या चौघा जणांना नगरमध्ये अटक

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, सहायक निरीक्षक धिरज गवारे, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक श्रीवंत, बाळु वाघ यांनी बजावली.

तांत्रिक माहितीवरून उकल

सातपूर पोलिसांसह शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असता, त्यामध्ये कोणतीही संशयास्पद व्यक्ती आल्याचे दिसून आले नाही.

घरातच वरच्या माळ्यावर राहणाऱ्या ११ जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी सुरू असताना संशयित जयकुमार यांच्या जबाबात तफावत तसेच, सीसीटीव्हीतील त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्यानंतर त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली

murder
Pune Crime : 11 गुन्हे, आठ महिन्यापासून फरार, अखेर जेरबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.