Birds Migration : पाणवेलींमुळे अभयारण्यातून पक्ष्यांचे स्थलांतरण

आजी-माजी आमदारांच्या प्रयत्नांनंतरही प्रश्‍न ‘जैसे-थे’
Waterfowl and birds in the bird sanctuary.
Waterfowl and birds in the bird sanctuary.esakal
Updated on

नाशिक : गोदावरी नदीमधून पाणवेली वाहत नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात पोचल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा उरली नसून खाद्य मिळणे मुश्‍कील बनले आहे. परिणामी, पक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे.

पाणवेलीच्या प्रश्‍नांवर आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम यांनी प्रयत्न करूनही प्रश्‍नाची जटिलता ‘जैसे-थे' राहिली आहे. (Migration of birds from sanctuary due to watercourses nashik news)

पक्षी अभयारण्य परिसरात ‘ट्रॅश स्कीमर’द्वारे गोदावरीची स्वच्छता करण्यात यावी, असे मत पक्षी अभ्यासक व्यक्त करत आहेत. नाशिक स्मार्ट सिटी निधीतून एक कोटी ७५ लाख रुपयांचे ‘रोबोटिक मशिन’ घेण्यात आले आहे.

त्याद्वारे सायखेडा ते नांदूरमध्यमेश्‍वरपर्यंत गोदावरीची स्वच्छता करता येऊ शकेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. इथल्या गोदावरीच्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी झालेली नसली, तरीही नदीचे पाणी मोठ्याप्रमाणात प्रदूषित आहे असते दिसते. साथीचे, पोटाचे, त्वचेचे आजारांची समस्या स्थानिकांना भेडसावते.

पाणवेलीच्या समस्येमुळे पक्षीसंवर्धन करण्यास वन विभागास विविध अडचणी येतात. अभयारण्यामध्ये वर्षभर पक्ष्यांचा अधिवास राहावा, यासाठी धरणातील पाणीसाठा इथे स्थिर असायला हवा. परंतु मोठा पाऊस झाला, की धरण भरते आणि विसर्ग केल्याने पातळी खालावते. इथल्या परिसरात पक्षी वीण करताना अनेकवेळा त्यांचे अंडे आणि पिले वाहून जातात.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Waterfowl and birds in the bird sanctuary.
Nashik NMC News : पाणीपट्टी वसुलीत सव्वा कोटीची तूट! घरपट्टीच्या बाबतीत महापालिकेला दिलासा

"पाणवेलीसंबंधी सरकारसमवेत दोन वर्षांपासून संघर्ष चालला आहे. नाशिक महापालिकेचे पाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. त्यामुळे निफाड परिसरात प्रदूषित पाणी येते. उल्हासनगर पॅटर्नप्रमाणे सेंद्रिय कीटकनाशके फवारणी परिसरात केली गेली. त्याचा नेमका उपयोग अभ्यासावा लागेल. तसेच जे दूषित पाणी नदीत सोडतात त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे." - दिलीप बनकार, आमदार

"अभयारण्यामध्ये वर्षभर पक्ष्यांचा अधिवास राहावा, यासाठी धरणातील पाणीसाठा इथे स्थिर असायला हवा. यासाठी मी पाटबंधारे, वन, महसूल या तीन विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. कामे होण्यासाठी पत्र दिले आहे. नाशिक महापालिकेला अनेक वेळा सांगून प्रक्रिया करून पाणी सोडले जात नाही. महापालिकेने गांभीर्याने न घेतल्यास आंदोलनाखेरीज पर्याय असणार नाही." - अनिल कदम, माजी आमदार

"पक्षी अभयारण्यातील जलप्रदूषण आणि शहरातून वाहून येणाऱ्या पाणवेलींविषयी नाशिक महापालिकेला आम्ही पत्र दिले आहे. सांडपाणी प्रक्रिया करून ते नदीत सोडणे आवश्यक आहे. धरणातून पाणी सोडल्यावर पक्षी अभयारण्यात पाणवेली वाहून येतात. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य मिळत नाही. आम्ही ‘मेरी’मध्ये तपासणीसाठी पाण्याचे नमुने दिले आहेत. अजून त्याचा अहवाल मिळालेला नाही." - गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

Waterfowl and birds in the bird sanctuary.
Caste Validity : उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही; बाजार समितीच्या उमेदवारांना दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.