नाशिक : नांदूरमध्यमेश्वर(nandurmadhyameshwar) पक्षी अभयारण्यातील पाणवेली अन् टायफा मोठ्या प्रमाणात वाढल्याने पक्ष्यांना बसण्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे अनेक पक्ष्यांनी या भागातून स्थलांतरण केले आहे. गेल्यावर्षी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी(forest ofrficers) स्वतः पाण्यात उतरून पाणवेली काढल्या होत्या. आता नेमके काय होणार याकडे पक्षीमित्रांचे लक्ष लागले आहे. आजच्या कडाक्याच्या थंडीत सकाळी सात ते दहा या वेळेत वन विभागातर्फे झालेल्या पक्षीगणनेत ३० हजारांहून अधिक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला. (Migration of birds in Nashik due to waterlogging)
गोदावरी-कादवा नदीच्या संगमावर १९०७-११ मध्ये ब्रिटीशकालीन नांदूरमधमेश्वर धरण बांधले. उत्खानात गेंडा व रानटी हत्ती यांचे अवशेष सापडले होते. ते कोलकत्याच्या संग्राहलयात जतन करून ठेवलेत. धरणात गाळ साचल्याने पानपक्ष्यांना खाद्य मोठ्या प्रमाणात मिळू लागले. इथल्या पक्षी अभयारण्यात २६० हून अधिक जातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. १९८२ मध्ये वर्ल्ड वाइल्ड फंड ऑफ नेचर या पर्यावरणावर काम करणाऱ्या जागतिक संस्थेने इथे पहिल्यांदा पक्षी गणना केली. त्यात ७३ क्रमांकावर फ्लेमिंगो दिसल्याची नोंद आहे. फ्लेमिंगो पक्षी गुजरातमधून इथे स्थलांतरण करतो.
आजच्या पक्षीगणनेत पाणपक्षी २८ हजार ७२८, तर एक हजार ७८५ झाडांवरील पक्षी दिसून आले. हिवाळ्यात हजारो गुलाबी मैनेचे आगमन झाले आहे. रोहित पक्ष्याने हजेरी लावली. कॉमन क्रेन अडीच फुटाचा पक्षी अभयारण्यात पाहावयास मिळत असून, पक्षी गणनेत चमचा, वारकरी, उघड्या चोचीचा करकोचा, राखी बगळा, गडवाल, युरीशियान विजन, कॉमन टील, जांभळी पानकोंबडी, पोचार्ड, रंगीत करकोचा आदींसह गवतावर राहणारे गप्पीदास, वेडा राघू, मुनिया, डव, हुदहुद, पीपीट, बुलबुल, नीलकंठ, दयाळ, नाचण आदी पक्षी आढळले. शिवाय मार्श हेरीअर शिकारी पक्षी पाहावयास मिळाला. वन विभागाच्या पक्षी गणनेत सहायक वनसंरक्षक विकास अहिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर, वनपाल प्रीतेश सरोदे, वनरक्षक संदीप काळे, आशा वानखेडे, डी. डी. फाफाळे, पक्षीमित्र डॉ. जयंत फुलकर, नूरी मर्चंट, उत्तम डेर्ले, राहुल वडघुले, गाईड गंगाधर आघाव, प्रमोद दराडे, रोशन पोटे, पंकज चव्हाण, अमोल डोंगरे, ओमकार चव्हाण, विकास गारे, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संजीव गायकवाड, रमेश भराडे, अजय पावडे आदी सहभागी झाले होते.
वन विभागातर्फे पक्षी गणना करण्यात आली. थंडी अधिक असूनही पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. ३० हजार ५१३ पक्ष्यांची नोंद झाली आहे. वन विभागाने पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे.
-शेखर देवकर,
वन परिक्षेत्र अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.