Nashik News : नांदगावला दुष्काळाच्या झळा तीव्र; कामानिमित्त ग्रामस्थांचे स्थलांतर

drought
droughtesakal
Updated on

Nashik News : चालू वर्षी नांदगाव तालुक्यात जूनपासून पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांसह व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांचा प्रमुख खरीप हंगामात घेतलेले मका, कांदा, कपाशी या नगदी पिकांसह बाजरी आणि इतर कडधान्ये लागवड व पेरणी पिके जळून गेली तर तालुक्यातील बऱ्याच शेतजमिनी पाण्याअभावी पडीक पडल्या आहेत. (Migration of villagers of nandgaon for work due to drought nashik news)

या परिस्थितीमुळे तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांसह कधीही न जाणारे नागरिक स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऊस तोडणीच्या कामानिमित्त बाहेरगावी जाऊ लागले आहे.तालुक्यात पाऊस न पडल्याने याचा थेट परिणाम हा ग्रामीण भागातील बाजारपेठेवर झाला आहे.

स्थानिक किराणा, कापड, हॉटेल, स्टेशनरी कटलरी, रेडिमेड कपडे विक्रीचे, टेलर यांसह लहान मोठ्या किरकोळ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आठवडे बाजारातील गर्दी देखील रोडावली आहे.

व्याजदरात कपातीची मागणी

शासनाने दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता शेतकरी बांधवांसाठी विविध घेतलेले निर्णय स्वागतार्ह तर आहेत. त्याचबरोबर व्यापारी बांधवांनी विविध बॅंक, पतसंस्था, फायनान्स कंपन्या इत्यादी ठिकाणांहून व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज घेतले आहे.

दुष्काळ जाहीर झाला असला तरी यावर त्याचा काही परिणाम होणार नसल्याने कर्जाचे हप्ते थकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी कर्ज वसुली थांबविण्यासह तसेच व्याजदरात कपात करण्यासाठी काही निर्णय घेण्याची मागणी करीत आहे.

drought
Nashik News : प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे जखमी कुत्र्याला जीवदान

पिके अर्धवट सोडण्याची वेळ

काही शेतकरी बांधवांनी आपल्या विहिरीला थोडे फार पाणी असल्याने रब्बी हंगामातील कांदे व गव्हाचे पीक घेतले. मात्र आता ही पिके पाण्याच्या टंचाईमुळे अर्ध्यातच सोडण्याची वेळ आली आहे. तसेच कडाक्याच्या थंडी पडली तर जमिनीतील ओलाव्यावरच

उगवणारे ज्वारी, हरभरा इत्यादी पिके सुद्धा दरवर्षी होणाऱ्या पावसापेक्षा सरासरी ३० टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने जमिनीचे पोट भरले नसल्याने व परतीचा पावसाच्या भरवशावर पेरणी केलेले पीक देखील करपू लागले आहेत. तर येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याची समस्या तालुक्यातील अनेक गावांत भेडसावणार आहे.

विशेषतः तालुक्यातील पूर्व भागात घाटमाथ्यावर कुसुमतेल, ढेकु खुर्द, बुद्रूक, जातेगाव, चंदनपुरी, वसंतनगर एक व दोन, लोढरे, ठाकरवाडी, बोलठाण, जवळकी, गोंडेगाव रोहिले इत्यादी महसुली गावात ही पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे.

पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे

सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर परिसरात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी कोठेही मध्यम किंवा लघु प्रकल्प नसल्याने या परिसरात पडणाऱ्या पावसाचे ५० टक्के पाणी जळगाव जिल्ह्यात तर उर्वरित पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील खारीखामगाव आणि वैजापूर तालुक्यातील टुनकी येथील मध्यम प्रकल्पात जाते.

drought
Nashik News: अंबासन ते मोराणे सांडस रस्त्याची चाळण; रस्त्यावरील भगदाड ठरतेय जीवघेणे

परिणामी पाऊस असो किंवा नसो या परिसरात नेहमीच पाण्याची टंचाई जाणवत असते. घाटमाथ्यावरील पाण्याची समस्या कायमची नष्ट करण्याचे आश्‍वासन वेळोवेळी तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी दिले. मात्र कार्यवाही काही झाली नाही. त्यामुळे येथील टंचाई दूर करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजचे आहे.

drought
Nashik News: सिन्नर शिर्डी महामार्गावरील पदपथाची दुरावस्था; अपघात होण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.