Nandur Madhyameshwar Bird Sanctuary : नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये पावसाळ्यामध्ये वाढला किलबिलाट

Migratory birds have started arriving in Nandur Madhyameshwar Bird Sanctuary nashik news
Migratory birds have started arriving in Nandur Madhyameshwar Bird Sanctuary nashik newsesakal
Updated on

Nashik News : नांदूरमध्यमेश्‍वर (ता. निफाड) पक्षी अभयारण्यात पावसाळ्यामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. टायफा आणि पाणवेली काढल्याने स्थलांतरित पक्ष्यांचे पावसाळ्यात आगमन सुरू झाले.

गेल्या दोन वर्षांपासून अभयारण्याकडे पाठ फिरवलेल्या फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. शिवाय हिवाळ्यामध्ये सायबेरियामधून येणाऱ्या थापट्याचे दर्शन होऊ लागले. (Migratory birds have started arriving in Nandur Madhyameshwar Bird Sanctuary nashik news)

फ्लेमिंगो वीणसाठी गुजरातमधील कच्छमध्ये जातात. विश्रांतीसाठी ते अभयारण्यात आले आहेत. धरणातील पाणी कमी झाल्याने खाद्य मोठ्याप्रमाणात उपलब्ध झाल्याने पक्ष्यांची संख्या वाढली आहे. दुर्मिळ ब्लॅक बीटर्न (काळा तापस) हा पक्षी अभयारण्याच्या बाजूने वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या परिसरात पाहावयास मिळाला.

महाराष्ट्रात तो कमी प्रमाणात दिसतो. हे पक्षी मुख्यतः रहिवासी असले तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकापासून पूर्वेकडे चीन, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या उष्ण कटिबंधीय आशियामध्ये त्यांचा वावर दिसून येतो. राखी बगळा, रंगीत करकोचा यांनी या वर्षी बाभळीच्या वृक्षांवर वीण केल्याने त्यांची पिल्ले दिसताहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Migratory birds have started arriving in Nandur Madhyameshwar Bird Sanctuary nashik news
Nandur Madhmeshwar Bird Sanctury : पक्षी अभयारण्यातील नांदूरच्या राणीचे ऐन उन्हाळ्यात वीण!
नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे पावसाळ्यात आगमन सुरू झाले.
नांदूरमध्यमेश्‍वरमध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे पावसाळ्यात आगमन सुरू झाले. esakal

कमळ पक्ष्याची पावसाळ्यात येणारी लांब शेपटी आकर्षित करत असून, जांभळ्या पाणकोंबड्याची संख्या वाढली आहे. सुगरणीची वीण सुरू असल्याने त्या घरटी बनविण्यात व्यस्त आहेत. नराच्या अंगावरील पिवळा रंग आकर्षित करत आहे. टिटवी, तितर, तीन प्रकारच्या मुनिया, तीन प्रकारचे किंगफिशर दिसत आहेत. शिवाय पाण्यातील मासे, खेकडे खाण्यासाठी कोल्हे भटकंती करत आहेत.

"पक्षी अभयारण्यापावसाळ्यात पक्ष्यांची संख्या वाढत असून, आम्ही पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या वृक्षांची लागवड करत आहोत. धरणातील पाणी कमी झाल्याने खाद्य उपलब्ध असल्याने पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे." - शेखर देवकर, वनपरिक्षेत्र अधिकारी

Migratory birds have started arriving in Nandur Madhyameshwar Bird Sanctuary nashik news
Rare Birds: कान्हा अभयारण्यात पिवळ्या पायांच्या बटन लावाचे पहिले छायाचित्रे! सर्वेक्षणात आढळला पक्षी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.