Nashik News: गिरणा खोरे पुन्हा उपाशी ठेवणार का? वांजूळ पाणी संघर्ष समितीचा अजित पवारांना प्रश्न

नारपारचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याच्या घोषणेने संताप
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

Nashik News : अतितुटीच्या गिरणा खोऱ्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा आणि नांदगाव या नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांसाठीचे हक्काचे पाणी मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून आधीच गोदावरी खोऱ्यात पळविण्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांचा सिंहाचा वाटा होता. (Mill Valley starve again Question of Banjul Pani Sangharsh Committee to Ajit Pawar Nashik News)

आधीच गिरणा खोरे अवर्षणग्रस्त असताना या खोऱ्यासाठी केवळ प्रस्तावित असलेल्या वांजूळ पाणी- मांजरपाडा दोनचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याची घोषणा बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून कसमादेवासीयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

गिरणा खोरे उपाशीच ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित करून असा प्रयत्न झाल्यास पुन्हा एकदा मांजरपाडा-२ जनआंदोलन उभे राहणार, अशा इशारा वांजूळ पाणी संघर्ष समितीने देतानाच उपमुख्यमंत्र्यांचा निषेध केला आहे.

आधी इथली तहान भागवा, मग काय न्यायचे ते पाणी तिकडे न्या, पण घरच्याला उपाशी ठेवून दारच्याचे पोट भरू नका, असा उपरोधिक टोलाही समितीने लगावला आहे.

मांजरपाडा हा गिरणा खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी असलेला सिंचन प्रकल्प तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी गोदावरील खोऱ्यात रात्रीतून वळवून नेत गिरणा खोऱ्याला तेव्हाही उपाशी ठेवले.

त्या वेळी सध्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली मांजरपाडा आंदोलन उभारण्यात आले होते.

या आंदोलनाची धग म्हणून तेव्हा कसमादेवासीयांसाठी मांजरपाडा प्रकल्पाच्या बदल्यात वांजूळ पाणी- मांजरपाडा-२ प्रकल्प मंजूर करत व दोन्ही प्रकल्पाचे काम एकाच वेळी सुरू करण्याचे आश्वासन तत्कालीन जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

दशक उलटूनही त्याची पूर्तता झालेली नसतानाच श्री. पवार यांनी नारपारचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याची घोषणा बीड येथे केली. या घोषणेमुळे गिरणा खोऱ्याला पुन्हा उपाशी ठेवणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

श्री. पवार आपल्या सहकाऱ्यांचे राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी कसमादेनांच्या हक्काचे नारपारचे पाणी गोदावरी खोऱ्यात नेण्याची तयारी करीत आहेत. त्यासाठी एक लाख कोटी खर्च आला तरी चालेल नारपारचे पाणी बीडला पोचवू, अशी घोषणा त्यांनी केली.

श्री. भुजबळ हे देखील व्यासपीठावर होते. त्यांनी मांजरपाडा देवसाने प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. नारपारच्या खोऱ्यातले पाणी गोदावरी खोऱ्यात पळविले.

आता हीच रणनीती वापरून पुन्हा कसमादेवर अन्याय करणार का? हे सुरू असताना खानदेशचे मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, भारती पवार हे शांत कसे? हा प्रश्‍न आहे.

या नेत्यांनी एकत्र येऊन सर्व ताकद पणाला लावून वांजूळ पाणीप्रश्‍न मार्गी लावावा, असे आवाहन खानदेशवासीयांतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ajit Pawar
Nashik Rain Crisis: इगतपुरीत भात शेती संकटात; पर्जन्यमानात 23 टक्के घट

सुरगाणा तालुक्यातील केमच्या डोंगरात उगम पावणाऱ्या पश्चिम वाहिनी नार, पार, अंबिका, औरंगा, तान, मान या नद्यांचे ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे समितीच्या अहवालानुसार ५० टीएमसी पाणी लिफ्ट करणे शक्य आहे.

यामुळे २० टीएमसी पाणी उपलब्ध होऊन वांजूळ पाणी प्रवाही वळण योजना व मांजरपाडा-२ हे प्रकल्प नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पांतर्गत मंजूर करून अतितुटीच्या गिरणा खोऱ्याला हक्काचे पाणी देता येईल.

या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी कसमादेनांसह खानदेश पट्ट्यातील नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती कमी पडते. यातूनच पाणी पळविण्याचे प्रकार वारंवार घडतात. आज दुष्काळाची दाहकता प्रचंड जाणवत आहे.

अशा वेळी वांजूळ पाणी, नारपारची आवश्‍यकता लक्षात येते. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनीही या प्रकरणी आश्‍वासन दिल्यानंतर गाडी पुढे हललेली नाही. सर्वेक्षणावरच हा प्रकल्प अडकला आहे.

ना मंजुरी, ना हालचाली

पालकमंत्री भुसे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या येथील विभागीय आढावा बैठकीत मालेगाव जिल्हानिर्मिती, नारपार- वांजूळ पाणी या मागण्या केल्या. आमदार डॉ. राहुल आहेर यांनी लक्षवेधी मांडून लक्ष वेधले.

जलसंपदामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दोन महिन्यांत प्रकल्पाला मान्यता देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नऊ महिने उलटूनही मंजुरी मिळाली नाही.

नारपारच्या पाण्यावर गिरणा खोऱ्याचा दावा नैसर्गिक असताना हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा वांजूळ पाणी संघर्ष समितीचे प्रा. के. एन. आहिरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव देवरे, निखिल पवार आदींनी दिला आहे.

Ajit Pawar
Nashik NCP: ‘राष्ट्रवादी’ची संघटनात्मक पुनर्रचना; निष्ठावान कार्यकर्त्यांना सामावून घेण्याच्या धोरणाचा भाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.